पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने पुण्यात रणनीती आखली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर पुण्यातील नेते वसंत मोरे, शहर प्रमुख गजानन थरकूडे आणि संजय मोरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एक विशेष फाइल सुपूर्द केली. या फाइलमध्ये भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचा कच्चा चिठ्ठा मांडण्यात आला आहे.
फाइलमध्ये भाजपच्या एकहाती सत्तेत राबवलेल्या प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराची आकडेवारी आणि पुरावे आहेत. मागील निवडणुकीत भाजपने वचननाम्यात दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली आणि किती फसवणूक झाली, याची सविस्तर माहितीही समाविष्ट आहे. ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले की, ही फाइल पुणेकरांना भाजपच्या फसवणुकीचा लेखाजोखा देण्यासाठी आहे.
भाजपच्या गलथान कारभाराच्या अनेक प्रकरणांचा भांडाफोड उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात करण्याचे नियोजन आहे. यासाठी उद्धव ठाकरे लवकरच पुण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात फाइलमधील माहितीचा आधार घेऊन भाजपला घेरण्याची रणनीती आखली गेली आहे.
मुंबईत शिवसेनेच्या सत्तेकाळातील विकासकामांचा तुलनात्मक लेखाजोखाही या फाइलमध्ये आहे. ठाकरे सेनेने हे सांगितले की, भाजपच्या भ्रष्टाचाराशी तुलना करून पुणेकरांना खरी चित्र दाखवली जाईल. मुंबईतील कारभार आणि पुण्यातील गलथान यांच्यातील फरक अधोरेखित केला जाईल. या रणनीतीने ठाकरे सेनेने महापालिका निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे. फाइल सुपूर्द करून पुण्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वास संपादन केला असून, आगामी दौऱ्याची उत्सुकता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नवी मुंबईत ‘स्त्रीशक्ती’चा हिरवाईला हात; २०० झाडांचा संकल्प, मधुरा गेठे यांच्या हस्ते शुभारंभ!
-नागरी मंच सक्षम करणार, पालिका आयुक्तांची घोषणा, नागरिक म्हणाले, ‘आधी आमचं ऐका’
-कमला नेहरू रुग्णालयाला नवजीवन; २५ तज्ज्ञ डॉक्टर, अडीच लाखांपर्यंत पगार, ४२ कोटींची दुरुस्ती!
-नगरपालिका-नगरपंचायत मतदान: पुणे जिल्ह्यात दुपारी दीडपर्यंत ३५.६९%; निकाल २१ डिसेंबरलाच!














