Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

पुण्यात मुरलीधर मोहोळांच्या पथ्यावर पडणार वाढलेलं मतदान! मतांची नेमकी गोळाबेरीज काय?

by Team Local Pune
May 15, 2024
in पुणे शहर, राजकारण
पुण्यात महायुती विरुद्ध महाविकास आघडीच्या लढाईत रंगत; नागरिकांचा कौल कुणाच्या बाजूने? वाचा कुठे किती मतदान
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे लोकसभा मतदार संघामध्ये 13 मे रोजी मतदान पार पाडले. पुण्यामध्ये 51 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यानुसार एकूण 53.54 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या तुलनेत मतांचा टक्का सुमारे चार टक्यांनी वाढला आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा नक्की कोणाला होणार याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभानिहाय झालेले मतदानाची आकडेवारी बघता प्रथमदर्शनी वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा भाजपला म्हणजेच मुरलीधर मोहोळ यांना होणार असल्याचे दिसते आहे.

कसबा विधानसभा 

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

कसबा विधानसभा मतदार संघामध्ये 59.24 टक्के मतदान झाले आहे. 2019 मध्ये झालेल्या एकूण मतदानापेक्षा केवळ 2600 मतांची वाढ या मतदार संघांमध्ये झाली आहे. या मतदार संघात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार झाले. तोच ‘धंगेकर पॅटर्न’ चालणार का? अशाही चर्चा झडत आहेत. परंतु, त्या पोटनिवडणुकीमध्ये ‘मोदी फॅक्टर’ नव्हता. शिवाय ब्राह्मण समाजाची नाराजी होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीवरून लोकसभा निवडणुकीचा अंदाज बांधने चुकीचे ठरेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचाही परिणाम येथील मतदानावर नक्कीच झाला आहे.

वडगावशेरी विधानसभा 

वडगावशेरीमध्ये 2019 च्या तुलनेत 35 हजार 636 मतांची वाढ झालेली आहे. सहा विधानसभा मतदार संघामध्ये ही सर्वाधिक वाढ आहे. भाजपने लावलेली ताकद, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे आणि मुरलीधर मोहोळांचा या मतदार संघात असलेला नातेवाईकांचा गोतावळा यामुळे या वाढीचा अथवा मतदानाचा फायदा मोहोळ यांनाच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे.

कोथरूड विधानसभा 

कोथरूड हा तर भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदार संघामध्ये 2019 च्या तुलनेत सुमारे 17 हजार मतांनी वाढ झाली आहे. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर लागलेली वर्णी ही मोहोळांच्या दृष्टीने फायद्याची ठरणार आहे. कुलकर्णी यांनी लावलेला जोर आणि राज ठाकरे यांच्या सभेचा या मतदार संघावरही परिणाम झाला आहे. त्याचा फायदा हा मोहोळांनाच होणार आहे.

पर्वती विधानसभा

पर्वतीमध्ये 2019 च्या तुलनेत 5 हजार 704 मतांची वाढ झाली आहे. मागीलवेळी या मतदारसंघातून स्व. गिरिष बापट यांना मताधिक्य होतंच. यावेळीही आमदार माधुरी मिसाळ, बाबा मिसाळ यांनी वस्त्यांमध्ये लावलेला जोर, भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी लावलेली ताकद, पर्वती भागात ब्राह्मण मतदार आणि मोठ्या प्रमाणात असलेला व्यापारी वर्ग यामुळे या मतदार संघातही मोहोळ यांनाच त्याचा फायदा होणार आहे. शिवाय भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक याच विधानसभा मतदारसंघात असल्याने संघटनात्मक मोठी ताकद मोहोळांना मिळाली. तसेच राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनीही सक्रीयपणे सहभाग घेतला होता.

शिवाजीनगर विधानसभा 

शिवाजीनगरमध्ये 2019 च्या तुलनेत 1 हजार मतांची घट झाली आहे. तर कॅन्टोन्मेंटमध्ये 9 हजार 700 मतांची वाढ झाली आहे. याठिकाणी भाजपचे आमदार आहेत. येथे समसमान मते जरी गृहीत धरले तरी एकूण वाढ ही मोहोळांना फायद्याची ठरणार असल्याचे चित्र आहे.

Tags: आमदार रवींद्र धंगेकरपुणे लोकसभामुरलीधर मोहोळ
Previous Post

‘भिडू’ आणि ‘हे’ शब्द परवानगीशिवाय वापरल्यास होणार २ कोटींचा दंड; जॅकी श्रॉफ यांची उच्च न्यायालयात याचिका

Next Post

होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकलं मागे

Team Local Pune

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

by News Desk
July 23, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती

होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकलं मागे

Recommended

Murlidhar Mohol

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या ‘त्या’ चर्चेचा मुरलीधर मोहोळांनी केला खुलासा

November 30, 2024
Pune news

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

June 25, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved