Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे ‘ॲक्शन मोड’वर; आधी डान्सबार मालकांना नाचविले; आता बेलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले

by News Desk
February 4, 2026
in पुणे शहर, महाराष्ट्र
अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे  ‘ॲक्शन मोड’वर; आधी डान्सबार मालकांना नाचविले; आता बेलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाच्या खुर्चीत बसतानाच, बेकायदेशीरपणे डान्सबार थाटणाऱ्या बारमालकांना अद्दल घडविल्यानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी पुन्हा एकदा अतिक्रमणांवर आपली नजर वळवली आहे. काही महिन्यांपूर्वी बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरवला आणि आता नियम तुडवून उभारलेल्या मदरशा आणि मशिदीवरही हातोडा उगारला आहे. महापालिका निवडणूक आटोपताच डॉ. गेठे आणि त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळीच कारवाईचा धडाका लावून बेलापूरमधील (सेक्टर १९) मधील मदरशा आणि मशिद पाडली.

विशेष म्हणजे, बेकायदा उभारलेल्या बांधकामाची एक वीटही ठेवायची नाही, अशी ताकीद देऊन डॉ. गेठे यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घेऊन डोळ्यादेखतच कारवाई पार पाडली. अशा प्रकारे कारवाई करीत अतिक्रमण करणाऱ्यांना थारा नसेन, हाच इशारा यानिमित्ताने महापालिका प्रशासनाने दिला.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील काही ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक कामे बांधकामे करण्यात आली आहेत. विशेषतः हॉटेल त्यातही डान्सबार हे बेकायदा असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली होती. या व्यावसायिकांना नोटिसा देऊनही काणाडोळा केल्यानंतर मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी एका रात्री शे-सव्वाशे हॉटेल पाडून डान्सबार मालकांना जागेवर आणले होते. थेट बुलडोझर उभारून बांधकामे जमीनदोस्त करणाऱ्या डॉ. गेठेंविरोधात डान्सबारमालकांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाठ घेऊन नाराजी मांडली होती. त्यानंतरही आपला पवित्रा कायम ठेवून महापालिकेने कारवाईची मोहीम सुरूच ठेवली होती.

त्यानंतरही बेलापूर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेने कायम कारवाईचा धाक दाखवला. अशातच बलापूरमधील (सेक्टर १९) या  भागातील मदरशा आणि मशिदवर कारवाई करीत, नियमबाह्य धार्मिक स्थळांवरही कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. “नवी महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा निवासी आणि व्यावसायिक मिळकतींवर नियमित कारवाई केली जाते. शहरात अशा प्रकारची बांधकामे होऊ नयेत, यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करीत आहोत. त्याचाच भाग म्हणून, मदरशा आणि मशिदीवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम कायमस्वरुपी राबविली जाते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Tags: Navi Mumbai News
Previous Post

‘अजितदादांच्या विकासदृष्टीचा सन्मान म्हणून पुणे पालिकेत पुतळा उभारावा’, प्रमोद भानगिरेंची मागणी

Next Post

फेसबुकवर प्रेम अन् ऑनलाइन गेमिंगसाठी फसवणूक तरुणाची ९२ हजारांची लूट, मुख्य आरोपी अटकेत

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
पुनर्विवाह करु इच्छिणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा; पोलीस कारवाईची धमकी देत उकाळले ७२ हजार

फेसबुकवर प्रेम अन् ऑनलाइन गेमिंगसाठी फसवणूक तरुणाची ९२ हजारांची लूट, मुख्य आरोपी अटकेत

Recommended

आधी म्हणाले, ‘मित्राचा मुलगा’ आता शरद पवार त्यांनाच म्हणाले ‘फडतूस माणूस’

July 20, 2024
‘मोदींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा, पण विरोधकांच्या इंजिनात मात्र…’; पुण्यातील प्रचारसभेत फडणवीसांची बोचरी टीका

…म्हणून पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही- देवेंद्र फडणवीस

May 11, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved