पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर दारू पार्टी करताना दिसत आहेत. लहू बालवडकर यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत अमोल बालवडकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सुसंस्कृत पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकांना हीच अपेक्षा असते.
काल रात्रीपासून सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात एवढेच नमूद करावेसे वाटते की, राजकारणात टीका… pic.twitter.com/A0xIZdZnQt
— Lahu Balwadkar (@LBalwadkar) January 9, 2026
लहू बालवडकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुसंस्कृत पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकांना हीच अपेक्षा असते.” या व्हिडिओमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, अमोल बालवडकरांवर टीकेची झोड उठली आहे.
याच मुद्द्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत अमोल बालवडकरांवर घणाघाती टीका केली. “निलेश घायवळ कुठे गेला याचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, निलेश घायवळ याला शोधायला अमोल बालवडकरची मदत घ्या,” असा टोला पाटील यांनी लगावला. अमोल बालवडकर किती सुसंस्कृत नेता आहे हे आता कळले असेल, असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले की, “अमोल बालवडकर कितीही आरडा ओरड केला तरी काही नाही. देवेंद्र फडणवीस यांना अनेक गोष्टी माहिती असतात, त्यामुळे अनेक बाबी समोर येतात. त्यांनी अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले हे आता कळले असेल.” निलेश घायवळ यांच्यासोबत ज्याचे फोटो आहेत, त्याची मदत घेऊन शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या व्हिडिओमुळे प्रभाग ९ मधील राजकीय वाद आणखी तापला आहे. लहू बालवडकर आणि अमोल बालवडकर यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला असून, निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकरण पुण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार’- सनी निम्हण
-बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा लहू बालवडकरांना जाहीर पाठिंबा
-प्रभाग २४ साठी आरोग्याचा भक्कम किल्ला; गणेश बिडकरांच्या नेतृत्वात कमला नेहरू रुग्णालयाचा कायापालट














