Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

by News Desk
May 23, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आता चांगलाच गडद झाला आहे. भाजपने जिल्ह्यात केवळ स्वतःच्या संख्याबळावर नव्हे, तर स्थानिक आघाड्यांची ताकद सोबत जोडत पुण्याच्या जागेवर थेट आणि मजबूत दावा ठोकला आहे. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून तब्बल ३३३ मतांचे भक्कम बळ असल्याचा दावा केला आहे. या बळाच्या जोरावर पुण्याची जागा भाजपलाच मिळावी, अशी थेट मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या नव्या राजकीय गणितानुसार, पुणे जिल्ह्यात सध्या भाजपच सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष असल्याचा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. भाजपचे जिल्हाभरात एकूण ३०९ सदस्य निवडून आलेले आहेत. या बळामध्ये आता जिल्ह्यातील दोन प्रमुख स्थानिक आघाड्यांची मोठी भर पडली आहे. यामध्ये इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य आणि दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’च्या १७ सदस्यांचा समावेश आहे. या दोन्ही आघाड्यांची २४ मते आणि भाजपची स्वतःची ३०९ मते मिळून एकूण ३३३ मतांची वज्रमुठ तयार झाली असून, याच ‘३३३’ च्या मॅजिक फिगरवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

वास्तविक पाहता, पुणे जिल्हा हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि प्रभावक्षेत्र मानला जातो. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे सध्या जिल्ह्यात केवळ २९८ सदस्य असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य हेच मुळात ‘राष्ट्रवादी’पेक्षा अधिक आहेत आणि त्यात आघाड्यांच्या २४ मतांची भर पडल्याने भाजपने तब्बल ३५ मतांची स्पष्ट आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. या सांख्यिकीय वर्चस्वामुळे महायुतीच्या जागावाटपात पुण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच सुटावी, यासाठी पक्षाने वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

गणेश बीडकर यांनी मांडलेल्या या दाव्याचे मुख्य केंद्रस्थान पुणे महापालिकेतील भाजपची एकहाती ताकद हेच मानले जात आहे. महापालिकेतील एकूण १६५ सदस्यांपैकी तब्बल ११९ सदस्य एकट्या भाजपचे आहेत, तर त्या तुलनेत अजित पवार गटाकडे केवळ २७ सदस्य असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरातील हे प्रचंड वर्चस्व आणि जिल्ह्यातील ३३३ मतांचे एकत्रित गणित यामुळे पुण्याची जागा अखेरीस भाजपच्याच पदरात पडेल, असा ठाम विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला असून तसा सूर आता पक्षात आवळला जात आहे.

दरम्यान, गणेश बीडकर हे स्वतः या जागेसाठी इच्छुक असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी आणि बैठकांचा सपाटा तीव्र केला आहे. ‘३३३’चा हा मोठा आकडा वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवून भाजपने आता मित्रपक्षांवर राजकीय दबाव वाढवला आहे. हक्काची आणि वर्चस्व असलेली ही जागा जर मित्रपक्षाला सोडली, तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी भीतीही स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या या ‘३३३ च्या चक्रव्यूहा’ला छेद देत अजित पवार गट ही जागा स्वतःकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरतो की महायुतीचे वरिष्ठ नेते यावर वेगळा तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-Solapur Vidhanparishad: संख्याबळचे गणित सुटले मात्र उमेदवारीचा तिढा कायम, भाजपमध्ये ज्येष्ठांना संधी की नव्या दमाच्या चेहऱ्याला पसंती!

-पुणे पालिकेत नीट पेपरफुटीवरून विरोधकांचा जोरदार राडा, सभागृहात घोषणाबाजी अन् गोंधळ

-पुणेकरांनो सावधान! शहराच्या ७ प्रमुख एन्ट्री पॉईंटवर पोलिसांचा ‘कडक’ पहारा; आजपासून वाहनांची कसून तपासणी

-संतापजनक! ‘मुलगा होत नाही’ म्हणून पत्नीच्या गुप्तांगावर ओतलं ॲसिड अन् १५ दिवस ठेवलं डांबून

-पुणेकरांना मिळणार कमी दरात कर्करोगावर उपचार, देशातील पहिल्या पीपीपी तत्वावर उभारलेल्या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण

Tags: bjpDevendra FadnavisGanesh BidkarncppuneSunetra Pawarगणेश बीडकरदेवेंद्र फडणवीसपुणेभाजपराष्ट्रवादी काँग्रेससुनेत्रा पवार
Previous Post

Solapur Vidhanparishad: संख्याबळचे गणित सुटले मात्र उमेदवारीचा तिढा कायम, भाजपमध्ये ज्येष्ठांना संधी की नव्या दमाच्या चेहऱ्याला पसंती!

Next Post

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Next Post
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

Recommended

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

June 16, 2024
Pune news

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

June 25, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved