Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली

by News Desk
April 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच शिरुर लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याच चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. ‘अमोल कोल्हे हे महागद्दार’ असल्याचा आरोप दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे. त्यावर ‘महागाईने जनता, शेतकरी त्रस्त असताना कारवायांपासून वाचण्यासाठी त्याच्याच मांडीवर जाऊन बसले त्यांचीच पालखी वाहायची याला महागद्दार म्हणतात’, असं कोल्हे मोहितेंना म्हणाले आहेत.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडच्या विधानसभा मतदारसंघातील अनेेक गावांमध्ये दौरा केला आहे. यावेळी आमदार दिलीप मोहिते हे अमोल कोल्हे यांना महागद्दार म्हणाले आहे. ‘आढळराव पाटील यांनी रस्ते, महामार्ग, बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी तसेच अन्य केलेली कामेच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कार्यअहवालात दाखविली आहेत. कामांचे श्रेय लाटणे म्हणजे एक प्रकारची चोरीच नाही का?, असेही दिलीप मोहिते म्हणाले आहेत. दिलीप मोहितेंच्या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हेही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

अमोल कोल्हे काय म्हणाले?

“मोहिते यांच्या वयाचा, अनुभवाचा मान ठेवून प्रामाणिकपणे सांगतो की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम भाजपने केले आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी ८३ टक्के सुशिक्षितांना बेरोजगार केले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप मंत्र्यांचा पोरगा चिरडतो, पेट्रोल शंभरीपार तर गॅस हजारच्या पार जातो. याला गद्दारी म्हणतात”

“ही गद्दारी उघड्या डोळ्याने दिसत असतानासुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची, याला महागद्दारी म्हणतात. इतिहासातील हंबीरराव मोहिते खंबीर होते. हे मोहिते महागद्दार आहेत. केवळ कुठल्यातरी कारवाईपासून वाचण्यासाठी महागद्दारीचा आरोप करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, अशी माझी भावना आहे”, असे अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहितेंना आक्रमक उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुनेत्रा पवारांना भाषणावरून टोल करणाऱ्यांना अजित पवारांचे सणसणीत उत्तर, म्हणाले “पहिल्यांदा पाटी कोरीच….”

-अजित पवार ‘कचाकचा’ शब्दावरुन झाले ट्रोल; स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी ते वक्तव्य….’

-आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा उपदेश नक्की वाचा…

-अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; पहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?

-“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल

Tags: ajit pawarAmol KolheDilip MohiteKhedLoksabha Electionncpsharad pawarShirurShivajirao Adhalrao Patilअजित पवारअमोल कोल्हेखेडदिलीप मोहितेराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशरद पवारशिरूरशिवाजीराव आढळराव पाटील
Previous Post

सुनेत्रा पवारांना भाषणावरून टोल करणाऱ्यांना अजित पवारांचे सणसणीत उत्तर, म्हणाले “पहिल्यांदा पाटी कोरीच….”

Next Post

भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर

भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर

Recommended

Pune

चिमुकली टीव्ही बघायला गेली अन् नराधम शेजाऱ्याने संधी साधली, शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना

May 21, 2025
Maharashtra Police

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

June 6, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved