Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

औंध-बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

by News Desk
February 24, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
औंध-बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, ज्ञानेश्वर जाविर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, प्रभागातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयुक्तांकडे मागील अनेक दिवसांपासून वेळ मागण्यात येत होता. मात्र काल आयुक्तांनी स्वतःहून प्रभागाला भेट देण्याची तयारी दर्शवत, नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता आयुक्तांनी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

या दौऱ्यात तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम (चिखलवाडी) तसेच हरीश ब्रिज शेजारील मोकळे पटांगण या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सर्व संबंधित खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त नवल किशोर राम यांनी विपश्यना विहार व हॉकी स्टेडियमच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत, ही कामे कोणताही विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जागेवरच दिले. तसेच हरीश ब्रिजलगत असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या ठिकाणी नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान (गार्डन) विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रत्यक्ष पाहणीमुळे औंध–बोपोडी प्रभागातील रखडलेले व महत्त्वाचे प्रकल्प आता वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी त्यांचा सन्मान करून वेळ दिल्याबद्दल आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

-‘अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ पूर्वी पूर्ण व्हावे’; राघवेंद्र मानकरांची महापौरांकडे मागणी

-पुण्यातील ‘त्या’ स्पा सेंटरवर छापा: भीतीने मॅनेजर आणि महिलेची खिडकीतून उडी मारली अन्…

-भाजपची एकहाती सत्ता, बिनविरोध निवडणुका आणि बिडकरांची अचूक रणनीती; पुणे महापालिकेत नवा पॅटर्न

-जुन्या-नव्यांचा मेळ बसवला, भाजपाकडून विषय समित्यांच्या अध्यक्षांची नावे निश्चित; बापट, जावळे, वस्तेंसह सहा जणांना संधी

-औंध-बोपोडीत रंगले बाल-कलाकारांचे विश्व; सनी निम्हणांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा, दिला स्वच्छतेचा संदेश

Tags: Aundh BopodipuneSunny Nimhanऔंध-बोपोडीपुणेसनी निम्हण
Previous Post

‘अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ पूर्वी पूर्ण व्हावे’; राघवेंद्र मानकरांची महापौरांकडे मागणी

Next Post

अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
Next Post
अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

Recommended

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी; वाकडमध्ये २७ लाखांची रोकड जप्त

April 24, 2024
पुणे जिल्ह्यात महाविकास-महायुतीमध्ये टाय; प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार विजयी

June 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved