पुणे : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच प्रभागातून भाजपने लोकप्रियता घटलेल्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट केला होता. पुण्यामध्ये भाजपने तब्बल 40 विद्यमान आमदारांचे तिकीट कापली. बहुतांश ठिकाणी माजी नगरसेवकांनी पक्षाचा आदेश स्वीकारून एकनिष्ठ राहत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करण्यास सुरुवात केली आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये पक्षाने लोकप्रियता घटल्याने अमोल बालवडकर यांना काही काळ थांबण्यास सांगितलं होतं. मात्र अति आत्मविश्वासापोटी अमोल बालवडकर यांनी पक्षाशी पंगा घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी हात मिळवणीकेली आणि भाजपाशी बंडखोरी केली आहे. बालवडकर यांच्या या बंडखोरीमुळे एकीकडे भाजपला मला मानणारा वर्ग नाराज झाला असून दुसरीकडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून देखील नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचाराला उपस्थिती लावली. मात्र या प्रचाराच्या सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावांतांनी लावलेले बोर्ड चर्चेचा विषय ठरले. बोर्डच्या माध्यमातून सुस बाणेर आणि पाषाणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही सवाल केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन
-‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी
-पक्षविरोधी भूमिकेचा अमोल बालवडकरांना फटका; खापर मात्र वरिष्ठांवर फोडलं
-प्रचाराचा शंखनाद अन् नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद, प्रभाग ९ मध्ये भाजपची भव्य पदयात्रा
-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजप मध्ये प्रवेश, प्रभाग ८ मध्ये भाजपला बळकटी














