Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर

by News Desk
October 24, 2024
in Pune, राजकारण, विधानसभा
Indapur
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

इंदापूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अशात पुणे जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघापैकी असणाऱ्या इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि महाविकास आघाडीकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे.

दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आधीपासूनच कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात या विधानसभेला पुन्हा एकदा सामान रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने राजकीय समीकरण बदललं आणि हे दोन्ही नेते महायुतीमध्ये एकत्र आले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

आज समस्त इंदापूरकरांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माझ्यावर प्रेम करणारे आपले कार्यकर्ते, नागरिक माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित… pic.twitter.com/5KScXVGsdz

— Harshvarrdhan Patil (@Harshvardhanji) October 24, 2024

इंदापूरमधून लढण्यासाठी आधीपासून इच्छुक असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि  पाटलांना इंदापूरमधून उमेदवारी देखील मिळाली. आज हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तसेच राष्ट्रवादीकडून (शरद पवार) उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या सोनाई दूध संघाचे प्रवीण माने हे हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे तसेच उमेदवारीवरुन नाराज होते. त्यांच्या नाराजीवर पक्षाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आली नसल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत इंदापूर विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मानेंच्या उमेदवारीमुळे हर्षवर्धन पाटलांच्या मताधिक्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शरद पवार त्यांची समजूत काढणार का? प्रवीण माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? की हर्षवर्धन पाटलांना टक्कर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ

-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?

-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा

-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला

-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?

Tags: Assembly ElectionbjpDattatraya BharneHarsh Vardhan PatilIndapurNationalist Congress PartyPraveen ManeSupriya Suleइंदापूरदत्तात्रय भरणेप्रवीण मानेभाजपराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकसु्प्रिया सुळेहर्षवर्धन पाटील
Previous Post

मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ

Next Post

पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
Aba Bagul

पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?

Recommended

सुनेत्रा पवारांना भाषणावरून टोल करणाऱ्यांना अजित पवारांचे सणसणीत उत्तर, म्हणाले “पहिल्यांदा पाटी कोरीच….”

सुनेत्रा पवारांना भाषणावरून टोल करणाऱ्यांना अजित पवारांचे सणसणीत उत्तर, म्हणाले “पहिल्यांदा पाटी कोरीच….”

April 18, 2024
‘आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” कार्यकर्त्यांनी शरद पवारांपुढेच सांगितलं ‘या’ नेत्याचं नाव

अजित पवारांविरोधात शरद पवारांची खेळी; ‘या’ तरुणांना मिळणार तुतारीकडून संधी

August 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved