पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून मोठी प्रसिद्धी आहे. याच पुणे शहरामध्ये गेल्या २ दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मोबाईलमधील हिडन अॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवत होता. भक्तांचे अश्लील व्हिडीओ फोटोज घेत होता. पुण्यातील सुस भागातील ब्रह्मांडनायक मठात प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार या भोंदूबाबाविरोधात आता भक्तासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या भोंदूबाबा विरोधात आतापर्यंत १५ ते १६ तरुणांनी तक्रार केली आहे. प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याने भक्तांचे मोबाइल फोन हाताळताना गुप्तपणे ॲप डाउनलोड करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली आणि त्या माहितीचा गैरफायदा घेत होता.
प्रसाद बाबाचे वडील भीमराव दातीर यांनी काही वर्षांपूर्वी या मठाची स्थापना केली होती. प्रसादने २०२२ मध्ये स्वतःला बाबा म्हणवून घेत मठाचा ताबा घेतला. त्याने भक्तांना प्रभावित करण्यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये ‘एअर ड्रॉइड कीड’ हे ॲप भक्तांच्या नकळत डाउनलोड करायचा. या ॲपद्वारे त्याला भक्तांच्या मोबाइलमधील कॅमेरा आणि इतर माहितीचा पूर्ण ताबा मिळायत होता.
भक्तांच्या दैनंदिन हालचाली आणि कपड्यांचा रंग यासारख्या गोष्टी त्याला माहिती असल्यामुळे त्याने भक्तांना विश्वासात घेतलं. प्रसाद बाबा भक्तांना दोन दिवस केवळ तीन तास झोपण्याचा सल्ला द्यायचा आणि नंतर त्यांना मठात बोलावून अघोरी विद्येच्या नावाखाली कपडे काढून झोपायला सांगायचा. झोपेच्या अभावामुळे थकलेल्या भक्तांवर तो लैंगिक चाळे करायचा आणि त्यांना लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. त्यामुळे भक्तांना आपल्या समस्या दूर होत असल्याचा भास व्हायचा.
प्रसाद बाबाने अशा प्रकारे अनेक तरुणांचे शोषण केले, ज्यामुळे त्याचे इंस्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. देहूरोड येथील ३९ वर्षीय बांधकाम व्यवसायिक आणि त्याच्या मेहुण्याने प्रसाद बाबाच्या या कुकर्मांचा पर्दाफाश केला. मेहुण्याच्या मोबाइलमधील मेमरी फुल झाल्याचे नोटिफिकेशन आल्यानंतर ‘एअर ड्रॉइड कीड’ ॲपचा प्रकार उघड झाला. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी प्रसाद बाबाला अटक केली. या प्रकरणाने पुणे आणि परिसरात खळबळ उडाली असून, भक्तांनी अशा बाबांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-महाराष्ट्र हादरला: पंढरीला चाललेल्या वारकऱ्यांची लूट, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना
-स्वारगेट प्रकरणी मोठी अपडेट, दत्ता गाडेला जामीन मिळाला?
-पुण्यात इराणी देशाचे झेंडे अन् अली खामेनींचे फ्लेक्स, नेमका काय प्रकार?
-प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?