पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याला हादरुन सोडणारी घटना घटली होती. यामध्ये एका २६ वर्षाच्या मुलीवर आरोपी दत्ता गाडे याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पीडित तरुणीने याबाबत तक्रार दिल्यानंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. अटकेत असणाऱ्या आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला आहे.
आरोपी दत्ता गाडे यांनी त्याच्या वकिलांमार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला असून, जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. २७) आदेश होण्याची शक्यता होती. मात्र न्यायालयाने आज आदेश देत आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारीला पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीने तरुणीची दिशाभूल करून तिला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये जायला सांगितले तिच्या मागोमाग हा देखील गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात आरोपीच्या वकिलांकडून पीडितेबाबत वादग्रस्त वक्तव्ये करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असून, आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात इराणी देशाचे झेंडे अन् अली खामेनींचे फ्लेक्स, नेमका काय प्रकार?
-प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?
-पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं
-विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात