पुणे : येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे पालिका निवडणुकीची तयारी आणि दुसरीकडे पुण्यात भाजपच्या दोन नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळत आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“शेखर चरेगावकर यांनी भाजपच्या पदाचा गैरवापर केल आहे. यशवंत सहकारी बँकेत माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी 150 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे”, असा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. “ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आरबीआयच्या प्रशासकाची नियुक्ती आणि घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे, मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं. सहकार मंत्र्यांकडे गेलो पण काहीच कारवाई झाली नाही”, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत.
शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल चारेगावकर यांनी धमकीचे फोन केले, असा देखील गंभीर आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला. त्यामुळे भाजप नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना त्याच भाजप नेत्याच्या भावाने धमक्या दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
“यशवंत सहकारी बँकेच्या ठेवीदारांना तुम्ही कोणाच्या नादी लागताय? या आधी आम्ही त्यांचं तिकीट कापलं यापुढे देखील त्यांचं तोंड कसं बंद करायचं हे आम्हाला माहीत आहे”, अशी धमकी शार्दूल चारेगावकर यांनी दिल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान, “सरकारमधील लोकांकडून दबाव असल्याचं अधिकारी आम्हाला सांगत आहेत”, असंही मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
ठेवीदारांनी आपल्या कष्टाचे लाखो रूपये यशवंत सहकारी बँकेत ठेवले होते. मात्र, शेकडो कोटींच्या अर्थिक घोटाळ्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत. शेखर चरेगावकर हे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष होते. त्यामुळे घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल
-पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला
-छत्रपती संभाजी महाराज जयंती: पालिका प्रशासनाची उदासीनता, शंभूप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी
-PMC सुरक्षा रक्षक निविदा: प्रशासनाचा ‘तो’ नियम कायमच; विशिष्ट ठेकेदारासाठी नियमांचा खेळ?