पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने १६ मे २०२५ रोजी भुकूम येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळाले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वैष्णवीचे मृत्यू प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करत या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणीचे काही ऑडिओ क्लीप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.
वैष्णवीची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल झाली अन्…
या प्रकरणात वैष्णवीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या मैत्रिणीशी सोशल मीडियावर केलेला संवाद समोर आला आहे, जो एबीपी माझाने प्रसिद्ध केला. या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाबद्दल बोलते. ती म्हणते, “आई-वडिलांचा विरोध करून शशांकसोबत प्रेमविवाह केला, ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरच मी घटस्फोट घेणार आहे.” या ऑडिओ क्लीपनंतर वैष्णवी घटस्फोट घेणार असल्याचे स्पष्ट बोलत आहे. मात्र, घटस्फोटापूर्वीच तिला टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे पहायला मिळत आहे.
“तुम्ही सत्तेत आहात, पदाधिकाऱ्याला वाचवणार की…?”
वैष्णवी हगवणेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर जारी झालेल्या या मृत्यू प्रमाणपत्रात वैष्णवीच्या मृत्यूचे कारण आणि तिच्या शरीरावर मारहाणीच्या ठळक जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात राजेंद्र हगवणे यांना अटक करण्याची मागणी करत अजित पवार यांना सवाल केला आहे, “तुम्ही सत्तेत आहात, पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंड्याच्या बळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार?”
जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवलेला अटक कधी होणार ?
अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार? pic.twitter.com/bTRGQk3PgW— SushmaTai Andhare (@andharesushama) May 21, 2025
वैष्णवीच्या आत्महत्येमागे सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी झालेला छळ कारणीभूत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक केली आहे, परंतु राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सध्या फरार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न
-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…
-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच
-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी