पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी केलेल्या पोलिसांवर कारवाई झाली. त्यानंतर आता पुणे पोलिस दलातील आणखी एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाघोली येथील १० एकर जमीन हडपण्यासाठी संगनमत करून फसवणूक केल्या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये बनावट महिलेला जमिनीची मालक म्हणून सादर करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात राजेंद्र लांडगे यांच्यासह आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे आणि अपर्णा यशपाल वर्मा यांच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी तपास पथक स्थापन केलं असून, संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे, आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे. पुणे शहरातील चंदननगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष लांडगे यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील तब्बल १० एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून, बनावट महिला उभी करून तिला मूळ मालकिणीच्या स्वरूपात सादर केल्याचा आरोप या आरोपींवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग समोर आल्याने पुणे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. शहरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाचा पारदर्शक तपास करण्याचे आश्वासन दिले असून, लांडगे आणि इतर आरोपींवर कठोर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे पुणे पोलिस दलाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जमिनीच्या वादात पदाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासातून या प्रकरणातील सर्व पैलूंचा खुलासा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला
-छत्रपती संभाजी महाराज जयंती: पालिका प्रशासनाची उदासीनता, शंभूप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी
-PMC सुरक्षा रक्षक निविदा: प्रशासनाचा ‘तो’ नियम कायमच; विशिष्ट ठेकेदारासाठी नियमांचा खेळ?