पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी वारी करत असतात. हा आषाढी वारी सोहळा महाराष्ट्रात महत्वाचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा मानला जातो. वारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते. मात्र या आनंदच्या आषाढवारीला गालबोट लागलं आहे. लाखो वारकरी ‘माऊली माऊली’चा जयघोष करत करत पंढरीचा वाट चालत आहेत. या वारकऱ्यांची वाट अडवून लूट केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचंही घडकीस आलं आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटलं अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. या घटनेमुळे दौंडसह राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांची सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास १०० रुपयात देत असल्याचे सांगत भाविकांची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना घडली. यावरुन आता वारी सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम सुरु असल्याचे समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
-स्वारगेट प्रकरणी मोठी अपडेट, दत्ता गाडेला जामीन मिळाला?
-पुण्यात इराणी देशाचे झेंडे अन् अली खामेनींचे फ्लेक्स, नेमका काय प्रकार?
-प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?
-पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं