Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी

by News Desk
May 28, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या अपघात प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार वारंवार समोर येत आहे. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताची चाचणी करताना रक्ताच्या नमुन्यांमधे बदल करण्यात आला. यावरुन ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच याप्रकरणी तपासासाठी एसआयटी समितीही स्थापन करण्यात आली आहे. ससून रुग्णालयामधील व्यवस्थापनावर सातत्याने होणाऱ्या आरोपांवरुन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे महत्त्वाची विनंती केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या…

— Supriya Sule (@supriya_sule) May 28, 2024

“पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. आणि आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी २ वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हव”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे अपघात प्रकरणी एसआयटी समिती स्थापन; भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉक्टरच समितीच्या अध्यक्षा, नेमका काय प्रकार?

-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?

-‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल

-Pune Hit & Run: “शांत बसणार नाही, मी सगळ्यांची नावे घेणार”; डॉ तावरेंच्या इशाऱ्याने अनेकांचे धाबे दणाणले

Tags: puneSasoon HospitalSassoon HospitalSupriya Suleपुणेससून हॉस्पिटलसुप्रिया सुळे
Previous Post

पुणे अपघात प्रकरणी एसआयटी समिती स्थापन; भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉक्टरच समितीच्या अध्यक्षा, नेमका काय प्रकार?

Next Post

भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉ. सापळेंची अध्यक्ष निवडीवर प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘माझी नियुक्ती शासनाकडूनच..’

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉ. सापळेंची अध्यक्ष निवडीवर प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘माझी नियुक्ती शासनाकडूनच..’

भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप असलेल्या डॉ. सापळेंची अध्यक्ष निवडीवर प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'माझी नियुक्ती शासनाकडूनच..'

Recommended

Vijay Shivtare

‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी

December 16, 2024
जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा

जानकर शरद पवारांच्या साथीला?; पवारांनी जानकरांसाठी सोडली माढाची जागा

March 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved