Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘पवार विरुद्ध पवार’ हा संघर्ष भाजपला करायचाच होता दुर्दैवानं अजित पवारांच्या…; रोहित पवारांचा गंभीर आरोप

by News Desk
February 17, 2024
in Pune, पुणे शहर
‘पवार विरुद्ध पवार’ हा संघर्ष भाजपला करायचाच होता दुर्दैवानं अजित पवारांच्या…; रोहित पवारांचा गंभीर आरोप
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्याला कुटुंबाने एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. त्यातच त्यांनी कार्यकर्ते आणि श्रोत्यांना भावनिक आवाहन देखील केले. त्यांच्या या भावनिक होण्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचे नेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

“अजित पवार अशा पद्धतीने नागरिकांना भावनिक करतील असे वाटले नव्हते. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय नागरिक आणि पवार कुटुंबीयांना आवडलेला नाही. भाजपला जे जमलं नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष उभा करुन केलं आहे”, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवाराच्या भावनिक होण्यावर टीका तर केलीच मात्र भाजपलाही धारेवर धरलं आहे. रोहित पवार हे आज आळंदीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

“त्यांना आणखी काय हवं होतं?”

‘मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर वेगळं काहीतरी मिळालं असतं. महाराष्ट्रातील निर्णय घेण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले, असं असताना त्यांना आणखी काय हवं होतं? पदच हवं होतं ना. भाजपकडे जाण्याचं कारण पदच आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जे भाजप ला जमलं नाही. ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप करून घेत आहे. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष जो भाजप उभा करत आहेत. दुर्दैवाने तो अजित पवार यांच्या माध्यमातून शेवटचा प्रयत्न केला जात आहे’, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

“अजित पवार बारामतीमध्ये ज्या पद्धतीने ते बोलत होते तिथे मला असे वाटले होते की लोकसभेची लढत ही बारामतीमध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ होईल. सुप्रियाताई या ठिकाणी खासदार आहेतच. आता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी भाजपने मुद्दामहून अजित दादांवर टाकलेली आहे. जे आजपर्यंत भाजपला जमलेले नव्हते ते त्यांनी आता दुर्दैवाने कुटुंब आणि पक्ष फोडून ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा त्यांच्याकडून अधिकृतपणे याची घोषणा होईल, तेव्हाच मला यावर सविस्तर बोलता येईल. उमेदवारी दिल्यानंतर पुढे काय करायचे हे लोक ठरवतील, पवारसाहेब ठरवतील” असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात

-भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर

-हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’

-धक्कादायक! पोलीस असल्याचं सांगत हवालाकडून ४५ लाख रुपयांची लूट; अप्पर पोलीस आयुक्तांनी तिघांना केलं बडतर्फ

Tags: ajit pawarAlandiBaramatibjpLok Sabha ElectionncpRohit Pawarsharad pawarअजित पवारआळंदीबारामतीभाजपराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवारलोकसभा निवडणूकशरद पवार
Previous Post

स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
‘मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं’; काकांनी सांगितला ‘भावनिक’ शब्दाचा अर्थ

'मीच एकटा आहे, हे भासवणं म्हणजे लोकांना भावनिक होणं'; काकांनी सांगितला 'भावनिक' शब्दाचा अर्थ

Recommended

पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

April 11, 2024
अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा शरद पवारांचा ‘पॉवर प्लान’ नवनिर्वाचित खासदारांसोबत ४ तास बैठक

अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’

July 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved