Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही….’; सुषमा अंधारे थेटच बोलल्या

by News Desk
January 28, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Sushama Andhare
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या अपयशानंतरही आघाडीची घडी बसत नसल्याचे चित्र दिसत आहे. अशातच काही महिन्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या नेत्यांनी मित्रपक्षांतील नेत्यांबाबत वक्तव्य करणं तसेच नाराजी बोलून दाखवत असल्याने आघाडीतील धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. आघाडीच्या अनेक नेत्यांनी स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली’, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी माध्यमांना दिली आहे. यानिमित्ताने आता महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर सारवासारवची भूमिका घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही पहायला मिळालं आहे.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इंदापूर, दौंड, पुरंदर आणि बारामतीच्या कार्यकर्त्यांनी कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. पण ती नाराजी सुप्रिया ताई यांच्याबद्दलची होती. त्यांचं म्हणणं होतं की, निवडणूक काळात आम्ही सुप्रिया ताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं. मात्र सुप्रिया ताई यांच्याकडून आम्हाला जसा प्रतिसाद हवा तसा मिळत नाही. त्यामुळे आम्ही थोडेसे दुखावले गेले आहोत. त्यावर संजय राऊतांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. मी दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी सुप्रिया सुळे यांना भेटेन तेव्हा तुमच्या भावना सांगेन. गरज पडल्यास इंदापूर, दौंड, पुरंदर, बारामतीच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली जाईल”, अशी ग्वाही राऊतांनी कार्यकर्त्यांना दिली आहे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

अंधारेच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

“आमच्याकडून काहीही कमतरता झाली असेल तर मी स्वत:हून त्याची नैतिकतेने जबाबदारी घेईन. मी ३० तारखेला मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहे. मी दौंड, इंदापूर आणि बारामतीच्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांना फोन करुन त्यांच्या मनातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करेन. मी दर १५ दिवसांनी मतदारसंघात असते. त्यावेळी मी महाविकास आघाडीची बैठक घेते. एखादा कार्यकर्ता दुखावला गेला असेल तर त्याची नाराजी दूर करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. मी तातडीने आजच्या आज शिवसैनिकांची नाराजी दूर होईल, यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करणार आहे. महाविकास आघाडीत कुणाचीही तक्रार येणार नाही, याची स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. ती जबाबदारी मी घेत आहे”, असे सुप्रिया सुळे सुषमा अंधारेच्या वक्तव्यावर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…

-लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा

-GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली

-Pune: पुण्यात वाढला GBSचा धोका; केंद्राचं पथक पुण्यात दाखल

-GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Tags: BaramatiDaundIndapurLocal Self-GovernmentMahavikas AghadiSupriya SuleSushma Andhareइंदापूरदौंडबारामतीमहाविकास आघाडीसुप्रिया सुळेसुषमा अंधारेस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…

Next Post

इच्छुकांनो गुडघ्याला बांधलेल्या मुंडावळ्या काढा, पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Pune Palika

इच्छुकांनो गुडघ्याला बांधलेल्या मुंडावळ्या काढा, पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

Recommended

हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा

हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा

March 21, 2025
लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात

लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात

March 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved