Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका

by News Desk
July 18, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारमध्ये प्रवेश केला. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अजित गव्हाणे यांच्या पक्षप्रेवशावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याच वेळी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा भोसरी विधानसभेत आज होणारा जनता दरबार अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला. मात्र ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द झाला असल्याची चर्चा आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

खासदार अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभेतून जनतेने सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिले आहे. अमोल कोल्हेंच्या खासदारकीसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केले होते. आणि याच काळात महाविकास आघाडीविरोधात अजित पवार गटाचे पदाधिकारी काम करत होते. याच पदाधिकाऱ्यांनी आता शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे भोसरी विधानसभेतील शिवसैनिक नाराज असल्याचे समोर आले आहे. याबाबत ते आज मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

दरम्यान, अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर भोसरी विधानसभेची उमेदवारी त्यांना जाण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भोसरीमध्ये १८ जुलै रोजी २ ठिकाणी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे दोन्ही जनता दरबार तूर्तास पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!

-नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच

-अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?; शरद पवार म्हणाले, ‘घरामध्ये सगळ्यांना जागा’

-‘पैसा येतो, जातो पण, माझ्यासाठी….’; सुनेत्रा पवारांच्या मोदीबागेतील भेटीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

-शिक्षण संस्थांनी मुलींना प्रवेश नाकारला तर….; चंद्रकांत पाटलांचा शिक्षण संस्थांना इशारा

Tags: ajit pawarAmol KolheAssembly ElectionBhosaribjpncpshivsenaअजित पवारअमोल कोल्हेभाजपभोसरीराष्ट्रवादीविधानसभा निवडणूकशिवसेना
Previous Post

महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला यश; चोविसावाडी-चऱ्होली येथील कचरा स्थानांतरण केंद्र अखेर रद्द!

Next Post

भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Uddhav Thackeray and Eknath Shinde

भीक नको, नोकऱ्या द्या; लाडका भाऊ योजनेवरुन ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे

Recommended

पुण्यात एफसी रोडवरील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी दिले पोलीस निरिक्षकांच्या निलंबनाचे आदेश

June 23, 2024
Swargate

स्वारगेट बस अत्याचारानंतर अखेर एसटी महामंडळाला आली जाग; ‘त्या’ बसचा होणार भंगारात लिलाव

March 15, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved