पुणे : दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या गौरव कुमार (वडिलांचे नाव – दिनेश कुमार) या व्यक्तीला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी रविवार, १८ मे २०२५ रोजी ही माहिती जाहीर केली. संशयास्पद हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, १८ मे रोजी रात्री ८ ते ९ च्या सुमारास खराडी परिसरात या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान पोलिसांनी फसवणुकीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले, ज्यात दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक कॉम्बॅट पँट, एक जोडी कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस आणि एक ट्रॅक सूट अप्पर यांचा समावेश आहे. गौरव कुमारवर भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गौरव कुमारवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणामांचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांनी संभाव्य फसवणुकीला आळा घालण्यात यश मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून ‘वासंतिक चंदन उटी’ महोत्सव आयोजित
-इंद्रायणी नदीपात्रातील ‘त्या’ ३६ बंगल्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर; कोट्यावधींचे बंगले जमीनदोस्त
-पुण्यातील ‘त्या’ बहुचर्चित रस्त्याला स्थगिती; नेमकं कारण काय?
-प्रेयसीने दिला लग्नाला नकार, त्याने थेट इनटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर टाकला