Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

by News Desk
January 22, 2025
in Pune, आरोग्य, पुणे शहर, राजकारण
MLA Hemant Rasane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome -GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. दूषित पाणी हा या आजाराचा मुख्य कारण ठरत असल्याने पाणी शुद्धीकरण आणि टाक्यांची स्वच्छता नियमितपणे करण्यावर भर देण्याची आवश्यकता यावेळी त्यांनी अधोरेखित केली आहे. यासंदर्भात आमदार रासने यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांची आज भेट घेतली.

‘गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करा. नागरिकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे. रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये GBS साठी स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावी’, अशी मागणी आमदार रासने यांनी केली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) आजराची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने जनजागृती करावी आणि या रुग्णांवर तत्काळ उपचार करावे. या संदर्भात आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. #GBS #syndrome pic.twitter.com/iTRyTq8XMO

— Hemant Rasane (@HemantNRasane) January 22, 2025

गेल्या काही दिवसांत शहरात ‘GBS’चे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, हा आजार संसर्गजन्य नसल्याने घाबरण्याची आवश्यकता नाही, नागरिकांना उकळून पाणी पिण्याचा आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे, असे आवाहन यावेळी आमदार रासने यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे , सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. कचरा मुक्त कसबा अभियान यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपायोजना. मुख्य रस्त्यांवर असणारी अतिक्रमणे हटवणे, तसेच मतदारसंघात काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने सुरळीत व प्रेशरने पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

-पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

-महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?

-खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

-घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…

Tags: GBSGuillain-Barre SyndromeMLA Hemant rasaneआमदार हेमंत रासनेगुलेन बॅरी सिंड्रोमजीबीएस
Previous Post

पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

Next Post

Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
Afu

Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्...

Recommended

Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिवतारे मैदानात; महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन

Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिवतारे मैदानात; महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन

April 2, 2024
10th Result

लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी

May 16, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved