पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले विक्रम संजय काकडे यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार काकडे यांच्याकडे सुमारे दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता असून विविध व्यक्ती व कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज काकडे यांनी दिल्याचा उल्लेख आहे. तसेच परवेज ग्रँट, श्रीशा एंटरप्रायझेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, राज डेव्हलपर्स यांच्यासह इतर व्यक्ती व संस्थांना मिळून सुमारे ४० कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची नोंद आहे.
काकडे यांच्या मालमत्तेमध्ये रोख रक्कम, बँक ठेवी, विमा गुंतवणूक, सोने-चांदी, आलिशान घड्याळे, मोटार कार आणि बोटींचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन














