Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

by News Desk
May 12, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मध्यरात्री राबवलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये ५ बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या महिलांकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. विशेष म्हणजे, देहविक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या या महिलांनी सुरुवातीला आपण पश्चिम बंगालच्या रहिवासी असल्याचा बनाव केला होता, मात्र पोलिसांच्या चाणाक्ष प्रश्नांसमोर त्यांचा हा खोटेपणा अवघ्या काही मिनिटांत उघड झाला.

पोलिसांनी या महिलांच्या संशयास्पद बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांची उलटतपासणी सुरू केली. जेव्हा त्यांना भारताचे राष्ट्रगीत म्हणायला सांगितले आणि देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले, तेव्हा त्या निरुत्तर झाल्या. इतकेच नाही तर पश्चिम बंगालमधील आपल्या गावांची नावे सांगण्यातही त्या अपयशी ठरल्या. या दोन साध्या प्रश्नांनी त्या भारतीय नसल्याचे सिद्ध झाले आणि त्यांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

फरासखाना पोलिसांनी ही कारवाई रविवारी रात्री १ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बुधवार पेठ परिसरातील माचिस बिल्डिंग आणि इतर भागात केली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात सहभागी झाल्या होत्या. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात घुसखोरांविरोधातील ही मोहीम तीव्र करण्यात आली असून, संशयितांची सखोल चौकशी केली जात आहे.

पुण्यात गेल्या ११ महिन्यांत तब्बल ९५ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घुसखोर संख्येमुळे पुणे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी पुण्यातून अशा घुसखोरांचे समूळ उच्चाटन कधी होणार? असा सवाल आता पुणेकर उपस्थित करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न

-राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

-पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-पुण्यात जमीन मोजणीचे डोंगर उपसण्यासाठी मोठा निर्णय! ४० नवे खासगी भूमापक नेमणार

-बारामतीत राजकीय हलचाल! सोमेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा राजीनामा

Previous Post

सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न

Next Post

पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

Recommended

Maharashtra Election

Assembly Election: विधानसभा बिगुल वाजलं; महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदान कधी?

October 15, 2024
“भविष्यात लढेल की नाही माहीत नाही….” आढळराव पाटील झाले भावूक

May 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved