Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

कसब्यात पोस्टरवॉर! रासनेंचे बॅनर्स हटवून लावले आमदारांचे बॅनर्स, प्रकरण थेट पोलिसांत

by Team Local Pune
January 3, 2024
in पुणे शहर, राजकारण
rasane vs dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: शहरातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha). सध्या शहरात लोकसभेची चर्चा असली तरी कसब्यात मात्र नागरिकांच्या विकासकामांवरून लावण्यात येणारे बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत. आता घोरपडी पेठेत भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांचे आभार मानणारे बॅनर्स हटवत आमदारांचे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर सुरु असणारे हे पोस्टरवॉर पोलिसांकडे तक्रार करण्यापर्यंत पोहचले आहे.

घोरपडी पेठेतील(Ghorpadi Peth)  न्यू मोमीनपुरा कब्रस्तान समोरील ड्रेनेज लाईनचे घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. स्थानिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या निधीतून दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. हेमंत रासने यांच्या माध्यमातून क्षेत्रीय आयुक्त सकपाळ यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला, त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसह स्वतः संबंधित ठिकाणी जात तात्काळ कामास सुरुवात केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. हे काम झाल्यानंतर रासने यांचे आभार मानणारे बॅनर्स देखील घोरपडी पेठेत लावण्यात आले.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

दरम्यान, काल रासने यांचे पोस्टर्स हटवत आमदारांचे आभार मानणारे “ना खासदारांनी काम केलं, ना नगरसेवकांनी काम केलं, काम केलं ते आमदारांनी” असे पोस्टर्स येथे लावण्यात आले. ड्रेनेज लाईनचे काम सुरु असतानाच एकाचे बॅनर्स हटवून दुसऱ्याचे बॅनर्स लागल्याने नागरिकांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली. “आधी आमच्या अडचणी सोडवा, मग तुमचे कितीही बॅनर्स लावा”, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. हा प्रकार घडल्यानंतर आक्रमक झालेल्या रासने समर्थकांनी थेट पोलिसांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली.

यासंदर्भात बोलताना हेमंत रासने म्हणाले “मोमीनपुरा येथील स्थानिकांनी माझ्याकडे ड्रेनेज लाईनची तक्रार केल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांकडे मी स्वतः पाठपुरावा केला. त्यामुळे ड्रेनेज लाईनची दुरुस्ती तसेच नवीन पाईप टाकण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली. माझ्या पाठपुराव्याने काम झाल्याने स्थानिकांनी आभार मानणारे बॅनर लावले. मात्र काही लोकांना फुकटच्या प्रसिद्धीसाठी बॅनरबाजी करण्याची सवय लागली आहे. आता न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांच्याकडून दादागिरी होताना दिसत आहे. तुम्ही शंभर बोर्ड लावा आमची काही हरकत नाही, मात्र आधी लावलेले बोर्ड काढले जात असतील तर खपवून घेतले जाणार नाही”.

Tags: hemant rasanekasba matdarsanghkasba vidhansabhamla ravindra dhangekarpune local newspune loksabhaकसबा विधानसभारवींद्र धंगेकरहेमंत रासने
Previous Post

केंद्राच्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये – बाबा कांबळे

Next Post

गुन्हेगारीमुक्त पुण्यासाठी कठोर पावले उचलावीत, मानकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Team Local Pune

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Next Post
गुन्हेगारीमुक्त पुण्यासाठी कठोर पावले उचलावीत, मानकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

गुन्हेगारीमुक्त पुण्यासाठी कठोर पावले उचलावीत, मानकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Recommended

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा; अयोध्या, वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘थ्रीडी ड्रोन शो’

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा; अयोध्या, वाराणसीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘थ्रीडी ड्रोन शो’

September 12, 2025
Hemant Rasane

दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम

December 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved