पुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. या आदेशानुसार, राज्य सरकारने निवडणूक प्रक्रिया सुरू केली असून, पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. सध्या जनगणना कार्यालयाकडून प्राप्त माहिती तपासण्याचे काम सुरू आहे. स्थळ पाहणी आणि प्रगणक गटांची पडताळणी यांसारखी पूर्वतयारी सुरू असून, अंतिम प्रभाग रचना अद्याप पूर्ण झालेली नाही.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रभाग रचनेबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे, ज्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप होत आहेत. मात्र, महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, प्रभाग रचनेचे काम अद्याप अंतिम टप्प्यात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानंतर राज्य सरकारने महापालिकांना निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. सध्या महापालिकांचा कारभार लोकप्रतिनिधींच्या सभागृहाची मुदत संपल्याने प्रशासक म्हणून नेमलेल्या आयुक्तांमार्फत चालवला जात आहे. पुणे महानगरपालिकेतही ही व्यवस्था कार्यरत असून, प्रभाग रचनेच्या कामाला गती देण्यात येत आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
“महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना निश्चित केल्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील आणि सुनावणीनंतर अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे. प्रभाग रचनेसंदर्भातील काम हे गोपनीय स्वरूपाचे असून, सध्या कोणताही नकाशा तयार करण्यात आलेला नाही, ही सद्यःस्थिती आहे”, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले आहे.
‘काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेल्या आरोपांमुळे सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आणि महापालिकेच्या संकेतस्थळावरून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करा’, असे ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं
-विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती
-‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग