पुणे : लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इराणी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर इराण देशाचे झेंडे आणि राज्याध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही हिंदुत्ववादी संघटनांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली होती. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. पोलीस निरीक्षक राजेश खांडे, उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार रामहरी वणवे, रवी आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळत इराणी समाजाशी चर्चा केली. त्यांना परवानगीशिवाय फ्लेक्स लावू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
इराणी समाजानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत परवानगी घेऊनच फ्लेक्स लावण्याचे मान्य केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सर्व झेंडे आणि फ्लेक्स काढण्यात आले. या संवेदनशील प्रकरणाला वेळीच आळा घालण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
महत्वाच्या बातम्या
-प्रभाग रचनेवर भाजप आमदारांचा प्रभाव?; पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं काय होतंय?
-पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं
-विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती