पुणे : पिंपरी-चिंचवडमधील सायली सुर्वे हिने आपल्या मुस्लिम पतीला सोडून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये मिस इंडिया अर्थ स्पर्धेत भाग घेतलेल्या सायलीने मीरा-भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासेसोबत लग्न केले होते. कुटुंबीयांचा विरोध झुगारून केलेल्या या लग्नानंतर सासरी सातत्याने छळ सहन करावा लागल्याची कबुली सायलीने धर्मांतरानंतर माध्यमांशी बोलताना दिली. तिने सांगितले की, लग्नानंतर चार मुले झाली असूनही तिचा छळ होत राहिला आणि धर्मांतराची सक्तीही करण्यात आली. अनेकदा पोलिसांत तक्रार केली, पण प्रतिसाद मिळाला नाही.
सायलीने हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात येऊन शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. धर्प पद्धतीने होम-हवन आणि मंत्रोच्चार करून तिचे हिंदू धर्मात पुन्हा समावेशन करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे आणि बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. लग्नानंतर तिचे नाव अतेझा तासे असे ठेवण्यात आले होते, ते बदलून आता तिला ‘अद्या सुर्वे’ हे नाव देण्यात आले आहे.
या घटनेमुळे इंटरफेथ लग्न आणि त्यानंतरच्या कौटुंबिक छळाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सायलीने सांगितले की, तिच्या कुटुंबीयांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तिला आधार दिला. तिने म्हटले की, “माझ्या मुलांसाठी मी हे धाडस केले. आता मी शांततेने जगू शकते.” या घरवापसीनंतर सायलीच्या कुटुंबीयांनी आणि तिच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे धार्मिक रूपांतर, प्रेमविवाह आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. सायलीच्या घरवापसीने अनेक मुलींना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तिच्या नव्या जीवनाला शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या वाढत असून, हा प्रकार समाजात मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत हात पकडला अन्…; शिवाजीनगरमध्ये पोर्टर डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग
-पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्…
-आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय














