पुणे : शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयाबाहेर कारमध्ये बसून विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी प्रणव केदार वझे (वय २२) असून, तो पुणे महानगरपालिकेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी प्रणव हा वारंवार आपल्या कारमधून महाविद्यालयाच्या आवारात येऊन बसायचा. गाडीत बसून तो पँट गुडघ्यापर्यंत खाली करून, समोर मोबाईल धरून तिथून जाणाऱ्या विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील कृत्य करायचा. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
भाजपच्या एका महिला नगरसेविकेला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. नगरसेविकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रणव वझे याला अटक केली. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय
-इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्राला, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद
-आधी निवडणुकीत पराभूत आता दाखल झाला गुन्हा, वसंत मोरेंच्या अडचणी वाढणार














