Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नियम धाब्यावर, ७००-८०० इच्छुकांनी थेट आयुक्तांकडे अर्ज, पक्षांच्या गटनेत्यांनाच शिफारस करण्याचा नियम डावलला

by News Desk
March 8, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेत ११९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असतानाच, आता स्वीकृत नगरसेवक पदांच्या वाटपावरून मोठी घमासान सुरू झाली आहे. महापालिका अधिनियमातील तरतुदींनुसार स्वीकृत सदस्यांची नावे राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार गटनेत्यांशी चर्चा करून निश्चित करावीत, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, हा नियम डावलून तब्बल ७०० ते ८०० इच्छुकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे अर्ज दाखल केले आहेत. हे प्रकार पुणे महापालिकेत पहिल्यांदाच घडले असून, नियमावलीचे उल्लंघन असल्याने हे अर्ज बाद होण्याची शक्यता अधिक आहे.

नव्या नियमानुसार महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. यामध्ये भाजपच्या वाट्याला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि काँग्रेसला १ पद मिळणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना पत्र देऊन स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे शिफारस करण्यास सांगितले आहे. ही नावे सोमवारी (९ मार्च) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयुक्तांकडे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या नियुक्त्यांना अंतिम स्वरूप मिळेल.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

निवडणुकीपूर्वी तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेल्या अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराजी आहे. तिकीट नाकारले गेल्याने अनेकांना अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद मिळावे म्हणून पक्ष नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू आहे. काहींना पक्षाने आश्वासन दिले असून, ते पद मिळवण्यासाठी थेट आयुक्तांकडे अर्ज दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व अर्जांमुळे नियमावलीचे उल्लंघन झाले असून, हे अर्ज बाद होण्याची शक्यता अधिक आहे.

या प्रकरणामुळे महापालिकेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ५ (२) नुसार स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया काय असावी, याचे स्पष्ट नियम आहेत. त्यानुसार आयुक्तांनी गटनेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करावीत आणि सभागृहासमोर ठेवावीत. सभागृहाला नाव फेटाळण्याचा अधिकार असतो. मात्र, थेट अर्ज सादर केल्याने आणि ते स्वीकारले गेल्याने नियमांचे उल्लंघन झाले असून, यामुळे न्यायालयीन वाद उद्भवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र मानकरांची निवड, संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार!

-“तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत हात पकडला अन्…; शिवाजीनगरमध्ये पोर्टर डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग

-पुणे पालिका अधिकाऱ्याच्या मुलाचा कारनामा, कॉलेजसमोरच पँट खाली करायचा अन्…

-‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवांतर्गत तिसरी ‘पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन’; रन फॉर अमृतकालमध्ये १७ हजार धावपटू सहभागी

-आता पीएमटी प्रमाणे पुणे मेट्रोतही असणार महिलांसाठी राखीव जागा! महिला दिनापासून लागू होणार निर्णय

Tags: punePune Palika.
Previous Post

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र मानकरांची निवड, संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार!

Next Post

दुसऱ्या धर्मात लग्न, लग्नानंतर छळ सहन केला अन् आता हिंदू धर्मात ‘अद्या सुर्वे’ परतली

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
Sayali Surve

दुसऱ्या धर्मात लग्न, लग्नानंतर छळ सहन केला अन् आता हिंदू धर्मात ‘अद्या सुर्वे’ परतली

Recommended

Avinash Bhosale

अखेर बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; नेमकं काय प्रकरण?

August 29, 2024
Municipal Commissioner

पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील ‘चोरी’च्या चर्चेला पूर्णविराम; चौकशीत एकही वस्तू गायब नसल्याचे सिद्ध

December 19, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved