Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आचारसंहितेचा भंग: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; धडक कारवाईत हॉटेलचालकासह मद्यपींवर गुन्हे दाखल

by News Desk
May 1, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
आचारसंहितेचा भंग: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; धडक कारवाईत हॉटेलचालकासह मद्यपींवर गुन्हे दाखल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अशातच पुणे शहरातील कोथरुड परिसरातील एका हॉटेल खिंड ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने छापा टाकला. या छाप्यात ढाबा चालक आणि मद्य पिणाऱ्या ४ मद्यपींना अटक करण्यात आली आहे.

ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हे ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असतानाच राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने छापा टाकत ढाबा मालकासह ४ ग्राहकांना अटक केली. अटक केलल्या सर्वांवर एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने ढाबाचालकाला १ लाख रूपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. 1 शिवाजी नगर, पुणे यांच्या न्यायालयात सादर केले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदिप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.

‘ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील’, असे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम यांनी कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष

-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?

-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार

-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत

-‘निवडणुकीच्या काळात कोणतीही टीका, वक्तव्ये गांभीर्याने घ्यायची नसतात’; अजित पवारांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

Tags: DrinkKothrudpuneState Excise Departmentकोथरूडपुणेपेयराज्य उत्पादन शुल्क विभाग
Previous Post

…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष

Next Post

मोदींच्या सभेने महायुतीला आणखीन बळ! शिरूरमध्ये नेमका परिणाम काय? कोणाचं पारड जड?

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा

मोदींच्या सभेने महायुतीला आणखीन बळ! शिरूरमध्ये नेमका परिणाम काय? कोणाचं पारड जड?

Recommended

ड्रग्ज प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा हात??? चौकशी सुरु

March 2, 2024
बारामतीत पोस्टर झळकले ‘सुनेत्रा पवार फिक्स खासदार’; अजित पवार गटाचा उमेदवार ठरला???

February 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved