Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन

by News Desk
February 11, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Maval BJP
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या आणि पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पक्षाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षाने तब्बल ६९ कार्यकर्त्यांची यादी तयार करून त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही कारवाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार केल्याचे सांगितले.

निवडणुकीपूर्वी पक्षाकडून तिकीट मिळावे म्हणून अडीच हजारांहून अधिक इच्छुकांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, इन्कमिंग आणि जागांच्या मर्यादेमुळे अनेकांना तिकीट मिळाले नाही. यामुळे काहींनी पक्षाविरोधात बंडखोरी करून स्वतंत्र उमेदवारी लढवली, तर काहींनी विरोधी नेत्याला मदत केली. अशा कार्यकर्त्यांवर पक्षाने आता कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघातून ७, कोथरूडमधून ६, कसबामधून ६, हडपसरमधून १९, खडकवासलामधून ९, वडगाव शेरीमधून ८, पुणे कॅन्टोन्मेंटमधून ९ आणि पर्वती मतदारसंघातून ४ असे एकूण ६९ जणांचा समावेश आहे. यातील बहुतांश जणांनी पक्षाकडून हकालपट्टी होण्याआधीच स्वतः सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे.

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्पष्ट केले की, “पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. पक्षातील कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही तात्काळ कारवाई केली जाईल.” या कारवाईमुळे पक्षात शिस्तीचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही कारवाई पक्षाच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग मानली जात आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की, भविष्यात अशा प्रकारच्या बंडखोरीला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या निर्णयामुळे पुणे भाजपमध्ये नव्या शिस्तीची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

निलंबित केलेल्या नेते

कसबा विधानसभा मतदारसंघ
धनंजय जाधव, चंद्रकांत पोटे, कादंबरी साळवी, जितेंद्र दळवी, किशोर तरवडे,

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
अमोल बालवडकर, सोमनाथ गुंड, मानसी सोमनाथ गुंड, अनिता तलाठी, पल्लवी गाडगीळ, दत्ता भगत, विनोद मोहिते

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
रमेश भंडारी, समाधान शिंदे, मधुकर मुसळे, प्रकाश ढोरे, बाळासाहेब रानवडे, मंजू वाघमारे, प्रीती वालेकर

हडपसर विधानसभा मतदारसंघ
संदीप लोणकर, स्मिता गायकवाड, संतोष शिंदे, युवराज कुचेकर, इम्तीयाज मोमीन, पुरुषोत्तम अण्णा दारवाटकर, अभिजीत डोंगरे, छाया गदादेनवल कुंजीर, समीर पठाण, प्रणव मोरे, योगेश सूर्यवंशी, अश्विनी योगेश सूर्यवंशी, नलिनी मोरे, संगिता ठोसर, अनिल मेमाणे, नितीन मारकड, सतिश मारकड, वर्षा मारकड, रुपेश घुले, बाप्पू पोकळे, किरण बारटक्के, अमोल रायकर,संदीप पोकळे, मोहिनी देवकर, रितेश रासकर, सचिन दशरथ दांगट, सुरेंद्र कंधारे.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
संदीप जहऱ्हाड, सुनीता गलांडे, किशोर वाघमारे, विजय चौगुले, अन्वर पठाण, राजू साखरे, ऐश्वर्या जाधव, जितेंद्र जगताप.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
प्रवीण खेडकर, स्मिता खेडकर, उज्ज्वला गौड, बाळासाहेब घोडके, सुरेश धनगर, स्वाती धनगर, सुवर्णा भरेकर, पल्लवी केदारी, राहुल शर्मा.

पर्वती विधानसभा मतदारसंघ
हरिष परदेशी, बंडू जायभाय, नीता थोरवे, प्रीतम नागापुरे.

महत्वाच्या बातम्या-

-बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!

-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता; पुणे-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

-अजित पवारांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात! रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘एमआयडीसी’

-सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, पुण्यातील नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने ठराव!

-राघवेंद्र मानकर यांचा आदर्श निर्णय, नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

Tags: bjppune
Previous Post

बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!

Next Post

‘एन. ए.’ परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Chandrashekhar Bawankule

'एन. ए.' परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

Recommended

पुण्यात ‘आघाडीत बिघाडी’; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन काँग्रेस-ठाकरे गटात वाद

पुण्यात ‘आघाडीत बिघाडी’; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन काँग्रेस-ठाकरे गटात वाद

April 27, 2024
Deepak Mankar

‘…तर आमच्याकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल’; भुजबळ समर्थकांना दीपक मानकरांचा इशारा

December 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved