Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

४० वर्षे काँग्रेसशी निष्ठा राखली, आता थेट शिवधनुष्य उचललं! बागुलांच्या पक्षप्रवेशाने बदलणार राजकीय समीकरणं

by News Desk
December 20, 2025
in पुणे शहर, राजकारण
४० वर्षे काँग्रेसशी निष्ठा राखली, आता थेट शिवधनुष्य उचललं! बागुलांच्या पक्षप्रवेशाने बदलणार राजकीय समीकरणं
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्याच्या राजकारणातील एक महत्वाचे नेते आणि माजी उपमहापौर उल्हास ऊर्फ आबा बागुल यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने महाविकास आघाडीच्या पालिका निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसशी ४० वर्षे निष्ठा राखलेल्या आबा बागुलांनी आज शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून आबा बागूल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चिन्हे दिसत होती. मात्र, त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश करत गुगली फेकली आहे.

आबा बागुल हे प्रभाग रचना बदलून देखील सलग ६ वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले. विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये आबा बागुल यांना पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पर्वतीची जागा असल्यामुळे आबा बागुलांना या ठिकाणाहून संधी मिळाली नाही. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा देखील परभव झाला. त्यानंतर आता आबा बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नवरात्रोत्सवामध्ये भाजपचे नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. यावरुन देखील बागुल भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर जवळपास शिक्कामोर्तब झालं होते. मात्र आता आबा बागुलांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत जोरदार गुगली टाकल्याचं पहायला मिळात आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

आबा बागुल यांची राजकारणात एन्ट्री

१९९२ साली नागरिकांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर १९९२ ते २०२२ पर्यंत ते सलग ३० वर्षे नगरसेवक राहिले. त्यांचे बंधू कै. अरविंद बागुल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, पण पराभूत झाले होते.

कोणती पदे सांभाळली?

आबा बागुल यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. १९९७ साली महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, २००७ ते २०१२ पर्यंत काँग्रेसचे गटनेते, २००८ ते २०१२ पर्यंत विरोधी पक्षनेते, २०१५ ते २०१७ पर्यंत उपमहापौर आणि २०२० पासून पुन्हा काँग्रेसचे गटनेते अशी पदे त्यांनी सांभाळली.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आबा बागुल यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने आता कॉग्रेसला मोठा धक्का बसला असून पालिका निवडणुकीत या पक्षप्रवेशाचे परिणाम दिसून येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात पहिल्यांदाच ठाकरे बंधू निवडणुकीच्या मैदानात एकत्र येणार! मनसे- ठाकरेसेना युतीवर लवकरच शिक्कामोर्तब

-ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास?

-पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातील ‘चोरी’च्या चर्चेला पूर्णविराम; चौकशीत एकही वस्तू गायब नसल्याचे सिद्ध

-धंगेकरांच्या ‘त्या’ मागणीला शिंदेंची केराची टोपली, पुण्यात रात्री महत्वाची बैठक, शिंदेसेना किती जागा लढण्यास तयार?

-पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शहराध्यक्ष वाघेरेंनी दिला राजीनामा, भाजप प्रवेश निश्चित!

Tags: Aba BagulCongressEknath ShindePalika Electionpuneआबा बागुलएकनाथ शिंदेकाँग्रेसपालिका निवडणूकशिवसेना
Previous Post

पुण्यात पहिल्यांदाच ठाकरे बंधू निवडणुकीच्या मैदानात एकत्र येणार! मनसे- ठाकरेसेना युतीवर लवकरच शिक्कामोर्तब

Next Post

बिडकरांची रणनीती अन् मोहोळांची व्यूहरचना! भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राजकीय गणित बदलले

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
बिडकरांची रणनीती अन् मोहोळांची व्यूहरचना! भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राजकीय गणित बदलले

बिडकरांची रणनीती अन् मोहोळांची व्यूहरचना! भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राजकीय गणित बदलले

Recommended

महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का

महापालिका निवडणुकीने पुण्यात वातावरण तापले, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; अजितदादांसह काँग्रेसला धक्का

December 27, 2025
महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना

महाराष्ट्र सरकार उचलणार तीर्थ दर्शनाचा खर्च; ज्येष्ठांसाठी काढली ‘ही’ नवी योजना

July 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved