पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील बंगल्यातून जुने आणि किमती साहित्य चोरीला गेल्याच्या चर्चांना उधाण आले होते. जून महिन्यात या अफवा जोर धरल्या होत्या. विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
वाघमारे यांनी भवन रचना, विद्युत, उद्यान, मध्यवर्ती भांडार विभाग आणि घोले रोड-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडून बंगल्यातील साहित्याची पडताळणी करून घेतली. सर्व विभागांनी एकमताने सांगितले की, आयुक्तांच्या निवासस्थानातून कोणतीही वस्तू गायब झालेली नाही. सर्व साहित्य जागेवरच आहे.
चौकशीचा गोपनीय अहवाल गेल्या महिन्यातच वाघमारे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना सादर केला होता. या अहवालात स्पष्ट नमूद आहे की, बंगल्यातील सर्व वस्तू सुरक्षित आहेत. या निष्कर्षामुळे चोरीच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेने यापूर्वी या चर्चेला अधिकृत दुजोरा दिला नव्हता.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर गेल्या महिन्यापासून हा अहवाल मागत होते. प्रशासन टाळाटाळ करत असतानाही गुरुवारी अखेर अहवाल त्यांना देण्यात आला. अहवालात सर्व साहित्य जागेवर असल्याचे निश्चित झाल्याने अफवांचा भांडाफोड झाला. या प्रकरणाने महापालिका प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आयुक्तनवल किशोर राम यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन अफवांना आळा घातला. आता पुणेकरांच्या मनातील शंका दूर झाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’
-‘मुलाखतीला गेलात तर भविष्यात…’ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ‘दादागिरी’














