पुणे : महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची १०८ रुग्णवाहिका गेल्या ११ वर्षांपासून राज्यातील १ कोटी १४ लाख ५८ हजार ३१६ रुग्णांसाठी खरी संजीवनी ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा अविरत सुरू आहे. अगदी ग्रामीण, डोंगराळ आणि आदिवासी भागातील रुग्णालाही १०८ ची वाहनं २४ तास मोफत सेवा देतात.
सध्या राज्यात ९३७ अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ALS) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (BLS) अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक वाहनात पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन यंत्रणा, डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी असतात. देशात देशात २४ तास डॉक्टर उपलब्ध करणारी ही एकमेव सेवा आहे.
५ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार अपघातातील ५.४४ लाख, हृदयरोगातील १.०३ लाख, उंचावरून पडलेल्या १.५९ लाख, विषबाधा झालेल्या २.६७ लाख, प्रसूतीवेळी १७.९६ लाख आणि वीज पडून जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ मदत मिळाली. विशेष म्हणजे आदिवासी बहुल गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती या जिल्ह्यांत १ लाख ३८ हजार ६६५ नागरिकांना या सेवेचा लाभ झाला.3
“डायल १०८” ही सेवा केवळ वाहन नाही तर आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवणारी जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या गरोदर माता, अपघातग्रस्त, हृदयरोगी किंवा विषबाधा झालेल्यांसाठी ही सेवा वरदान ठरते. ११ वर्षांत एक कोटी १४ लाखांहून अधिक जीव वाचवण्याचे श्रेय या सेवेला जाते. महाराष्ट्र सरकार आणि बीव्हीजी इंडियाच्या या यशस्वी भागीदारीमुळे राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवा देशात आदर्श ठरली आहे. “जीव वाचवणे हेच आमचे ध्येय” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत १०८ ची टीम आजही २४ तास सज्ज आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महापालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी, पुणे पालिका निवडणूक कधी?
-भाजपचा भ्रष्टाचार उघड करणारी ‘फाइल’ उद्धव ठाकरेंकडे; पुण्यात ठाकरे सेनेची रणनीती
-नवी मुंबईत ‘स्त्रीशक्ती’चा हिरवाईला हात; २०० झाडांचा संकल्प, मधुरा गेठे यांच्या हस्ते शुभारंभ!














