पुणे : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बहुतांश ठिकाणी युती होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये स्थान नसेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाने अनेकांना धक्का बसला असला तरी यामागे फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे होते. त्यावेळी ८५ जागांवर दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली होती. यापैकी ५० जागा भाजपने तर ३५ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. आता जर महायुती म्हणून एकत्र लढले तर या ८५ जागांवर एकच उमेदवार असेल, ज्यामुळे महाविकास आघाडीला मजबूत उमेदवार मिळू शकतो. मात्र, युती न करता लढल्यास भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तरी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल किंवा उलटही होऊ शकते. अशा प्रकारे महायुतीच्या एकूण फायद्याची शक्यता अधिक आहे. विजय किंवा पराभव झाला तरी महायुतीच फायद्यात राहील, अशी ही रणनीती आहे.
एकूण १६२ पैकी बहुतेक जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी थेट लढत होते. सध्याची प्रभाग रचना जुन्याच रचनेसारखी असल्याने यंदाही असाच पैलू दिसू शकतो. जर महायुती म्हणून एकत्र लढले असते तर परिस्थिती वेगळी असती. या रणनीतीमुळे महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत. महापालिका निवडणुकीत या योजनेचा फायदा होईल की नाही, हे निकालानंतरच स्पष्ट होईल, पण सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कमला नेहरू रुग्णालयाचे रुपडे पालटणार, १३ कोटींची कामे प्रगतीपथावर; आधुनिक सुविधा लवकरच मिळणार
-बोपदेव घाट लॉजवर छापा, बांगलादेशी तरुणींना देहविक्रीला प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक
-‘विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!
-लहू बालवडकरांचा गाव भेट दौरा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रभाग ९च्या विकासावर संवाद














