पुणे : वडगाव शेरी-चंदन नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा सचित सातपुते फाउंडेशनचे संस्थापक सचिन सातपुते यांनी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण ओवाळणी’ योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात बिगर शासकीय स्तरावर चालणारा हा पहिला आणि एकमेव उपक्रम असून, परिसरातील तब्बल २५०० महिलांना दरमहा १००० रुपये थेट मदत दिली जात आहे. शासकीय लाडकी बहीण योजनेच्या अटी वाढत असतानाही सातपुते यांनी हा उपक्रम नि:स्वार्थीपणे राबवला आहे.
रक्षाबंधनाच्या शुभ दिवशी या योजनेचा शुभारंभ झाला. सातपुते यांनी २५०० महिलांना ओवाळणी देण्याचा संकल्प सोडला होता आणि तो जवळजवळ पूर्णत्वास येत असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले. महिलांना आर्थिक आधार देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. परिसरातील महिलांमध्ये ही योजना अतिशय लोकप्रिय झाली असून, अनेकांनी सातपुते यांचे आभार मानले आहेत.
हा उपक्रम राज्यात आणि देशात खाजगी-सामाजिक स्तरावरचा पहिला असल्याचा दावा सातपुते यांनी केला आहे. भविष्यात हा उपक्रम पुणे शहर आणि जिल्हा पातळीवर विस्तारण्याचे त्यांचे नियोजन आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी असलेला हा प्रयत्न इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बोपदेव घाट लॉजवर छापा, बांगलादेशी तरुणींना देहविक्रीला प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक
-‘विश्वास विकास निर्विवाद’ माजी सभागृह नेते गणेश बिडकरांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन!
-लहू बालवडकरांचा गाव भेट दौरा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रभाग ९च्या विकासावर संवाद
-७ महिने पुणे विमानतळ परिसरातच लपलेला बिबट्या अखेर जेरबंद
-१०८ रुग्णवाहिकेची राज्यातील १ कोटी १४ लाख नागरिकांना मोफत आरोग्यसेवा














