Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!

by News Desk
February 11, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणी प्रकरणात फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्यानंतर पोलिस दलाने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजता शहर पोलीस दलाने मोठे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिट्सचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला.

या ऑपरेशनमध्ये बुधवार पेठेत येणारे-जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले. शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळील सर्व कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांनी कसून चौकशी केली. कुंटणखान्यातील महिलांची ओळख, कागदपत्रे आणि त्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्यात आली. तसेच या परिसरात वावरत असलेल्या तरुणांची झाडाझडती घेण्यात आली. अमली पदार्थ, जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य याबाबत विशेष लक्ष देण्यात आले.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या दरम्यान बुधवार पेठेतील ५० कुंटणखान्यांची झडती घेण्यात आली. अल्पवयीन मुलींवर जबरदस्तीने वेश्याव्यवसाय लादला जात आहे का, अमली पदार्थांचा पुरवठा होत आहे का, याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी अनेक संशयित व्यक्तींची चौकशी केली असून, काहींना ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू आहे.

या ऑपरेशनमुळे बुधवार पेठ परिसरात कायदा-सुव्यवस्थेची भीती निर्माण झाली असून, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये एक प्रकारचा सकारात्मक संदेश गेला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या बेकायदा व्यवहारांना आळा घालण्यासाठी अशा कारवाया नियमितपणे सुरू राहतील. विशेषतः बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याबाबत आणि वेश्याव्यवसायातील जबरदस्तीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई होत राहील.

या घटनेनंतर पुणे पोलिस दलाने शहरातील संवेदनशील भागांत अशा प्रकारच्या कोम्बिंग ऑपरेशन्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार पेठेतील ही कारवाई ही फक्त सुरुवात असून, पोलिस यंत्रणा आता अधिक सजग आणि कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता; पुणे-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

-अजित पवारांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात! रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘एमआयडीसी’

-सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, पुण्यातील नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने ठराव!

-राघवेंद्र मानकर यांचा आदर्श निर्णय, नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

-भाजपकडून स्वीकृत नगरसेवक कोण होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, अनेकांचे टेन्शन वाढले

Tags: Budhawar Pethpuneपुणेबुधवार पेठ
Previous Post

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता; पुणे-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

Next Post

निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Maval BJP

निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन

Recommended

धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त

March 6, 2024
Shirur Lok Sabha |  ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल

April 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved