Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

by News Desk
May 15, 2026
in Pune, पुणे शहर
पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राज्य सुधारित युवा धोरण समिती सदस्य सनी विनायक निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देत शिवाजीनगर मतदारसंघातील ब्रेमेन चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातील औंध येथील ब्रेमेन चौक हा पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक असून, औंध–विद्यापीठ परिसर तसेच मुंबई–बंगळुरू महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PMC-PCMC) यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने या मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा मोठा ताण वाढत आहे. याच मार्गावर अनेक व्हीआयपींची ये-जा होत असल्यामुळे हा “व्हीआयपी मूव्हमेंट रोड” म्हणूनही ओळखला जातो.

You might also like

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

सध्या ब्रेमेन चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहतूक रहदारी विस्कळीत होत आहे. नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये ब्रेमेन चौक येथे उड्डाणपूल / ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी निधीची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल (Feasibility Report) तयार करणे तसेच प्रकल्पाचे तांत्रिक नियोजन करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची मागणी श्री. निम्हण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बोलताना सनी विनायक निम्हण म्हणाले, “लोकभवन रोड हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या ठिकाणी ब्रेमेन चौक ते राजीव गांधी ब्रीज येथे उड्डाणपूल / ग्रेड सेपरेटर उभारण्यात आल्यास पुणे ते PCMC आणि PCMC ते पुणे असा प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणत्याही सिग्नलशिवाय अधिक जलद आणि सुरळीत प्रवास करता येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल.”

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित प्रकल्पाबाबत गोजारी साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

तसेच नुकतेच या मार्गावरील पोलिस विभागाच्या हेरिटेज इमारती हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यामुळे येत्या काळात हा संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी अधिक मोकळा आणि सुकर होण्यास मदत होणार आहे. यामुळे भविष्यातील वाहतूक नियोजन आणि प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाला अधिक गती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रस्तावित प्रकल्पामुळे औंध, शिवाजीनगर तसेच PMC-PCMC दरम्यानची वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

-सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न

-राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

-पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-पुण्यात जमीन मोजणीचे डोंगर उपसण्यासाठी मोठा निर्णय! ४० नवे खासगी भूमापक नेमणार

Previous Post

पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत खलबतं

News Desk

Related Posts

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक 'वर्षा'वर; फडणवीसांसोबत खलबतं

Recommended

‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच

‘आढळराव पाटलांना शिरूरचा खासदार करणारच’! कार्यकर्त्यांनी थेट घेतली शपथच

April 20, 2024
Ajit Pawar

कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार

March 28, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved