Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत खलबतं

by News Desk
May 17, 2026
in Pune, पुणे शहर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीनाट्याने आता एक वेगळंच वळण घेतलं आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खासदार पार्थ पवार यांनी कोणालाही सुगावा लागू न देता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष संघटनेत सक्रिय झालेले पार्थ पवार हे कुणाही नेत्याला सोबत न घेता एकटेच फडणवीसांना भेटायला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी ही भेट राष्ट्रवादीतील मोठ्या बदलांचे संकेत मानली जात आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे असा छुपा संघर्ष सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पटेल आणि तटकरे यांची नावे वगळली गेल्याने खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीने याला ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हटले असले तरी, ही खरोखरच तांत्रिक चूक होती की सुनेत्रा पवारांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना दिलेला हा जाणीवपूर्वक इशारा होता, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या वादात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बाळगलेले मौन अनेक गोष्टी अधोरेखित करत आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

या सर्व घडामोडीत आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शब्दांचे आसूड ओढले आहेत. अजित पवारांनी शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असा दावा करत रोहित पवारांनी थेट आरोप केला आहे की, तटकरे आणि पटेल हे २२ आमदारांना फोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. रोहित पवारांच्या या सनसनाटी आरोपामुळे पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.

पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या गुप्त भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार का? प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना खरोखरच साईडलाईन केले जाणार का? आणि २२ आमदारांच्या बंडाच्या दाव्यात किती तथ्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील. मात्र, तूर्तास पार्थ पवारांच्या या एका भेटीने महायुती आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे, हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

-पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

-सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न

-राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

-पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tags: bjpDevendra Fadnavisparth pawar
Previous Post

पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

Next Post

NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Next Post
NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक

NEET पेपरफुटीचा 'मास्टरमाइंड' गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक

Recommended

Vishay Shivtare

‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

March 28, 2025
Prashant Jagtap and PM Narendra Modi

महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

September 24, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved