पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून टाकणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. मृतदेहाची राख जवळच्या वड्यात फेकून दिली अन् दुसऱ्याच दिवशी पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांसमोर त्याची पोल खुली पडली अन् ‘दृश्यम’ स्टाइल खून उघडकीस आला.
आरोपीचे नाव समीर जाधव (वय ३५, व्यवसाय – फॅब्रिकेशन). तो मूळचा अमरावतीचा असून पुण्यातील शिवणे परिसरात पत्नी व दोन मुलांसह राहत होता. खून झालेल्या महिलेचे नाव अंजली समीर जाधव (वय ३२). ती खासगी शाळेत शिक्षिका होती. २०१७ मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगा (इयत्ता ५ वी) व एक मुलगी (इयत्ता ३ री) अशी दोन मुले आहेत. दिवाळी सुट्टीमुळे मुले गावी गेली होती.
समीरचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तरीही त्याने पत्नीवर संशय घेतला. त्याने एका मित्राला अंजलीच्या मोबाईलवर ‘आय लव्ह यू’ असा मेसेज पाठवायला सांगितला अन् स्वतःच त्याला उत्तर दिले. याच कारणावरून भांडणे वाढली.
२६ ऑक्टोबरला खेड शिवापूरजवळील गोगलवाडी येथे भाड्याने घेतलेल्या गोदामात समीरने चारचाकी गाडीने अंजलीला ‘गोदाम दाखवतो’ म्हणून नेले. तिथेच तिचा गळा दाबून खून केला. आधीच तयार केलेल्या लोखंडी भट्टीत मृतदेह जाळला. राख जवळच्या वड्यात फेकली अन् भट्टीही नष्ट केली. दुसऱ्या दिवशी (२७ ऑक्टोबर) तो स्वतः वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करायला गेला.
तपासादरम्यान तो वारंवार पोलीस ठाण्यात येऊन ‘माझी पत्नी कधी सापडणार?’ असे आतुरतेने विचारत होता. त्याच्या या अतिआत्मीयतेमुळे पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व सखोल तपासातून समीरच खूनी असल्याचे उघड झाले. गुन्हा प्रथम वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल करून नंतर राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
-‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं
-कथित जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपटेड: पार्थ पवारांना जमीन विकणारी ‘ती’ महिला नेमकी कोण?
-पार्थ पवार जमिन घोटाळा प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन; तहसीलदार काय म्हणाले?
-“इकडे कशाला टाईमपास करतोस?” राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, नेमकं काय झालं?
-भाजपचा गणेश बिडकरांवर विश्वास, पुणे महापालिका निवडणुकीसाठी सोपवली मोठी जबाबदारी!














