Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शहर अभियंता म्हणून तब्बल २३ वर्ष एकाच खुर्चीवर, २ हजार कोटींच्या मायाजालाचा आरोप; पुण्याचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारेंना हायकोर्टाचा दणका

by News Desk
April 20, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
शहर अभियंता म्हणून तब्बल २३ वर्ष एकाच खुर्चीवर, २ हजार कोटींच्या मायाजालाचा आरोप; पुण्याचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारेंना हायकोर्टाचा दणका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेच्या शहर अभियंत्याला वाचवण्याचा आयुक्तांचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने सपशेल हाणून पाडला आहे. माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कथित २ हजार कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) ‘खुली चौकशी’ रोखणारे आयुक्तांचे आदेश न्यायालयाने रद्दबात ठरवले आहेत. “भ्रष्टाचार हा देशाचा शत्रू आहे आणि तपास रोखून भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय देता येणार नाही,” अशा कडक शब्दांत न्यायालयाने प्रशासनाचे कान टोचले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण मे २०१६ मधील आहे, जेव्हा सामाजिक कार्यकर्ते ॲड. तानाजी बाळासाहेब गंभीरे यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. १९९४ मध्ये पालिकेत अभियंता म्हणून रुजू झालेले आणि २००३ पासून शहर अभियंता तसेच इमारत परवाना विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या वाघमारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अफाट संपत्ती गोळा केल्याचा आरोप यात करण्यात आला होता. वाघमारे यांनी ही रक्कम त्यांची पत्नी प्रज्ञा, भाऊ प्रमोद आणि विविध बांधकाम कंपन्यांच्या माध्यमातून वळवून सुमारे २ हजार कोटींची अपसंपदा गोळा केल्याचे तक्रारीत नमूद होते.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

एसीबीच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. चौकशी अधिकारी संजय पतंगे यांनी अहवालात नमूद केले की, वाघमारे यांनी आपल्या मुलाचे परदेशातील शिक्षण, परदेश दौरे, शेअर्समधील गुंतवणूक आणि बँक व्यवहारांची माहिती देण्यास ‘वैयक्तिक कारणे’ सांगून स्पष्ट नकार दिला होता. तपासात अजिबात सहकार्य मिळत नसल्याने आणि प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने एसीबीने ३१ जानेवारी २०१९ रोजी उघड चौकशीसाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ए अंतर्गत आयुक्तांकडे ‘पूर्व परवानगी’ मागितली होती.

आयुक्तांची ‘समांतर’ चौकशी आणि क्लिन चिट

तथापि, तत्कालिन महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी १६ आणि २५ एप्रिल २०१९ रोजी एसीबीची ही विनंती फेटाळून लावली. आयुक्तांनी स्वतःच एका समांतर न्यायालयाप्रमाणे वाघमारे यांना सुनावणी दिली आणि एसीबीला जी कागदपत्रे नाकारली होती, तीच कागदपत्रे वाघमारे यांच्याकडून स्वीकारून ‘बेहिशोबी मालमत्तेचा कोणताही खटला बनत नाही’ असा निष्कर्ष काढला. या निकासाच्या आधारे एसीबीने ही चौकशी बंद केली होती.

न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोंसले यांच्या खंडपीठाने आयुक्तांच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले की, अधिकार कक्षेबाहेर जाऊन तपास करणे किंवा आरोपीला सुनावणी देऊन निर्दोष ठरवणे हे आयुक्तांचे काम नाही. त्यांनी तपास यंत्रणेच्या अधिकार क्षेत्रात घुसखोरी केली आहे. कलम १७ए हे कलम केवळ अधिकृत कर्तव्य बजावताना घेतलेल्या निर्णयांच्या संरक्षणासाठी आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा करणे हे अधिकृत कर्तव्य असू शकत नाही, त्यामुळे अशा प्रकरणांत आयुक्तांच्या परवानगीची गरजच नाही. तपास यंत्रणेला माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आयुक्तांनी स्वतःच ‘मिनी ट्रायल’ चालवणे हे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे.

याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण, रोहन महाडिक, द जुरिज पार्टनर व इतरांसह यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांनी युक्तिवाद केला की, आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातले आहे. महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील संजीव कदम यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. अखेर, न्यायालयाने याचिका मान्य करत आयुक्तांचे २०१९ चे दोन्ही आदेश आणि चौकशी बंद करण्याचे सर्व निर्णय रद्द केले आहेत. एसीबीला शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याविरुद्ध कायद्यानुसार खुली चौकशी करून त्वरित आणि योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या विनंतीवरून या निकालाच्या अंमलबजावणीला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात आली असून, त्यानंतर एसीबी आपला तपास पुन्हा सुरू करू शकेल.

महत्वाच्या बातम्या-

-सुट्टीच्या दिवशीही महापालिका ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ कार्यरत; गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक

-प्रमुख नेते सोडले आणि कार्यकर्त्यांवर संक्रांत, पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत सावळा गोंधळ

-औंध-बोपोडीकरांसाठी ‘संजय गांधी रुग्णालय’ होणार मल्टीस्पेशालिटी, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पाठपुराव्याला यश

-फेसबुकवरून प्रेम, लग्न अन् दुहेरी हत्याकांड; गाढ झोपेत असणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुरडीचा…

-नाव ‘स्पा सेंटर’ पण आत सुरु होता वेगळाच कारभार, पुण्यातील उच्चभ्रू भागात पोलिसांची धाड

Tags: Mumbai High CourtPrashant WaghmarepunePune Palika.पुणेपुणे पालिकाप्रशांत वाघमारेमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

सुट्टीच्या दिवशीही महापालिका ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ कार्यरत; गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक

Next Post

इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, लग्नाचं आमिष अन् १२ पानांचं पत्र लिहून व्यावसायिकानं घेतला मोठा निर्णय

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

by News Desk
July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
Next Post
धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन

इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, लग्नाचं आमिष अन् १२ पानांचं पत्र लिहून व्यावसायिकानं घेतला मोठा निर्णय

Recommended

संग्राम जगतापांचं ‘ते’ वक्तव्य अन् अजितदादा पाठवणार ‘कारणे दाखवा नोटीस’

संग्राम जगतापांचं ‘ते’ वक्तव्य अन् अजितदादा पाठवणार ‘कारणे दाखवा नोटीस’

October 11, 2025
Lok Sabha | ‘मतदानाच्या दिवशी कामगारांना फुल पगारी सुट्टी द्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Lok Sabha | ‘मतदानाच्या दिवशी कामगारांना फुल पगारी सुट्टी द्या’; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

April 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved