पुणे : शहराच्या उच्चभ्रू भागामागील काळी बाजू उघड करणारी धक्कादायक घटना कल्याणीनगर परिसरात समोर आली आहे. मसाज सेंटरच्या आड देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
जॉगर्स पार्कजवळील ईश्वरधाम अपार्टमेंटमध्ये ‘निरा स्पा’ नावाने हे सेंटर सुरू होते. बाहेरून सर्वसामान्य स्पा वाटणाऱ्या या ठिकाणी आत मात्र मसाजच्या नावाखाली देहव्यापार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला असता हा प्रकार उघडकीस आला.
माहितीची खात्री होताच पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१) याला अटक करण्यात आली. या ठिकाणाहून दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, ‘राज’ नावाच्या संशयिताचा शोध सुरू आहे. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमूला आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
महत्वाच्या बातम्या-
-नगरसेवक सनी निम्हणांच्या पाठपुराव्याला यश, ‘राजभवन’ रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच गती मिळणार
-IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
-अश्लील फोटो व्हायरल करून २० लाखांची खंडणी मागणारा नराधम अटकेत; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई
-दिल्ली मॉडेल पुण्यात राबवण्याचा भाजपचा आग्रह, शिंदेंच्या शिवसेनेचा मात्र विरोध; महायुतीत ठिणगी
-औंध-डेक्कन बससेवा पुन्हा सुरू! नगरसेवक सनी निम्हणांच्या पाठपुराव्याने नागरिकांना मोठा दिलासा














