पुणे : महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची (अजित पवार आणि शरद पवार) युती निश्चित झाली आहे. वादग्रस्त जागांचा तिढा सुटला असून दोन्ही गट मिळून १६५ जागांवर लढणार आहेत. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत समोपचाराने तोडगा निघाला. शरद पवार गटाचे अंकुश काकडे यांनी “दुपारी तीननंतर जागांची संख्या स्पष्ट होईल” अशी माहिती दिली.
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सांगितले की, जिथे दोन्ही गटांचे उमेदवार आहेत, तिथे निवडून येण्याची क्षमता असलेल्याला संधी दिली जाईल. अजित गटाने १२५ एबी फॉर्म दिले असून शरद पवार गटाने ३५ पेक्षा जास्त दिले आहेत. ९ ठिकाणी दुहेरी अर्ज आहेत, तिथे चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी रविवारी तळवडे येथे युतीची घोषणा केली. “शहरातील सर्व प्रश्न एकत्र सोडवू,” असे सांगत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. पुण्यातही आता ही युती लागू होत असल्याने महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीचा संभ्रम कायम आहे. भाजपने शिंदे सेनेला फक्त १६ जागा दिल्या असून उमेदवारी माघारीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. शिंदे सेनेचे उमेदवार वरिष्ठ नेत्यांच्या संपर्काच्या प्रतीक्षेत आहेत. दुपारी तीननंतर चित्र स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती निश्चित झाल्याने भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी राहणार आहे. मात्र भाजप-शिंदे सेना युतीत संभ्रम असल्याने महायुतीला फटका बसू शकतो. जागावाटप आणि माघारीचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांना पिंपरी महापालिकेत धक्क्यावर धक्के, भाजपचा दुसराही उमेदवार बिनविरोध निवडून
-भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत
-भाजपच्या बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात
-प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
-ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘माणूसकीने श्रीमंत’ उमेदवार














