Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी

by News Desk
October 5, 2025
in Pune, पुणे शहर
आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी रात्री धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. पुण्यातील लोहगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बंडू खांदवे यांच्याकडून धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर लोहगाव परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या जमावाला शांत केल्याने मध्यरात्री १२च्या सुमारास तणाव निवळला.

बापूसाहेब पठारे हे लोहगाव वाघोली रोडवरील गाथा लॅान्स येथील एका माजी सैनिकांच्या सत्काराचा नियोजित कार्यक्रमासाठी गेले होते. याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य बंडू खांदवे बाहेर येत असताना आमदार पठारे यांची एन्ट्री झाली. तेथे दोघांमध्ये शाब्दिक वाद पेटला त्यानंतर झटापट झाली. आणि नंतर धक्काबुक्की झाली. ही माहिती मिळताच थोड्याच वेळात मोठा जमाव गाथा लॉन्स परिसरात जमला. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने काहीच वेळात गाथा लॅान्सला छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशीरापर्यंत विमानतळ पोलिस स्टेशनला दोन्ही बाजूकडून तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

बंडू खांदवे यांनी पत्रकारांशी बोलताना नेमकं काय घडलं ते सांगितलं? ‘मी त्यांना मारहाण केलेली नाही मला मारत असताना ते खाली पडलेले आहेत. तेव्हा त्यांना काय लागलं असेल ते मला माहित नाही. ते आमदार आहेत त्यांना काहीही बोलायचा अधिकार आहे. मला मारहाण झाली आहे जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे मी तक्रार दाखल करणार’, असं देखील बंडू खांदवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आमदार पठारेंचे चिरंजीव घटनास्थळी पोहचले त्यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. ‘हा व्यक्ती प्रत्येक निवडणुकीपूर्वी असा काहीतरी स्टंट करतो. त्याचे ३०-४० लोक हुल्लडबाजी करत होते. आमचा ३-४ हजार लोकांचा मॉब जर अंगावर गेला असता तर त्यांची काय अवस्था झाली असती, याचा विचार करा. मात्र, आम्ही संयमाने ही गोष्ट घेतली. हा फक्त एक पॉलिटिकल स्टंट आहे. आता इथे जे मॉब घेऊन आले होते त्या सगळ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत’ असं सुरेंद्र पठारे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-तरुणीशी मैत्री अन् कोरेगाव पार्कचे हॉटेल, मिठाई विक्रेत्याला महागात; तरुणीवर गुन्हा दाखल

-अंतिम प्रभाग रचना जाहीर, आता आचारसंहिता कधी? चंद्रकांतदादांनी थेट तारीखच सांगितली

-मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ‘या‘ प्रभागात झाले बदल

-‘त्या’ अपघात प्रकरणी हजर रहावे; गौतमीला सिंहगड रोड पोलिसांनी बजावली नोटीस

-तिचे कॉल अन् सीसीटीव्ही तपासा! गौतमी पाटील येणार अडचणीत? ‘त्या‘ प्रकरणात मोठी मागणी

Tags: ajit pawarBapusaheb PathareMLA Patharepunesharad pawarअजित पवारआमदार पठारेबापूसाहेब पठारेशरद पवारसुरेंद्र पठारे
Previous Post

तरुणीशी मैत्री अन् कोरेगाव पार्कचे हॉटेल, मिठाई विक्रेत्याला महागात; तरुणीवर गुन्हा दाखल

Next Post

पोर्शे कार अपघात: राजकीय दबावामुळे अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलंं?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Vishal Agrwal And Surendra Agrwal

पोर्शे कार अपघात: राजकीय दबावामुळे अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलंं?

Recommended

‘सध्या पुणेकर निकषापेक्षा जास्त पाणी वापरतात’; आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंच्या वक्तव्याने पुणेकर आक्रमक

April 17, 2024
Pune Police

रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं

March 7, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved