Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात अजितदादांची ‘पॉवर’, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा झटका

by News Desk
December 21, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्यात अजितदादांची ‘पॉवर’, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा झटका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजप ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून ताकद वाढवत आहे. महाविकास आघाडीसह मित्रपक्षांमधील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल होत आहे. भाजपने गेल्या वर्षभरातम मविआच्या बड्या नेत्यांना पक्षप्रवेश दिला आहे. राज्यातील नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांचा निकाल नुकताच समोर आला असून यामध्ये सासवड, भोरसारख्या ठिकाणी भाजपला काही यश मिळाले असले तरी जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे मनसुबे पूर्णपणे धुळीस मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने येथे दणक्यात विजय मिळवला.

२ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत जेजुरी नगरपरिषदेच्या १० प्रभागांतून २० नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष निवडले जाणार होते. १५ हजार ८०० मतदारांपैकी १२ हजार ३३३ मतदारांनी (७८ टक्क्यांहून अधिक) मतदान केले. एकूण ५३ उमेदवार रिंगणात होते. ही लढत थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात होती. दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासह प्रत्येकी २१ उमेदवार उतरवले होते.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष उमेदवार जयदीप बारभाई यांनी तब्बल ३ हजार मतांनी विजय मिळवला. पक्षाने १७ जागांवर विजय मिळवत बहुमत साकारले. भाजपला अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागले, तर एका जागेवर अपक्ष तानाजी खोमणे विजयी झाले. शिंदे गट, उबाठा गट आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.
जेजुरीतील हा विजय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा दिलासा ठरला आहे. पुणे जिल्ह्यात भाजपच्या आक्रमक रणनीतीला येथे खीळ बसली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा निकाल पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरला आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला जेजुरीत ब्रेक लागला असून, आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद पुन्हा सिद्ध झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

-‘आज २२ जणांचा प्रवेश झाला, पुढेही धक्कातंत्र चालू राहील’, महेश लांडगेंचा रोख नेमका कोणाकडे?

-बिडकरांची रणनीती अन् मोहोळांची व्यूहरचना! भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राजकीय गणित बदलले

-४० वर्षे काँग्रेसशी निष्ठा राखली, आता थेट शिवधनुष्य उचललं! बागुलांच्या पक्षप्रवेशाने बदलणार राजकीय समीकरणं

-पुण्यात पहिल्यांदाच ठाकरे बंधू निवडणुकीच्या मैदानात एकत्र येणार! मनसे- ठाकरेसेना युतीवर लवकरच शिक्कामोर्तब

Tags: ajit pawarbjpNagar ParishadpunePune BJPअजित पवारपुणेबारामतीभाजप
Previous Post

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

‘पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत’, जमीन घोटाळ्या प्रकरणी विजय कुंभार-अंजली दमानियांचा दावा!

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
Ajit Pawar And Parth Pawar

'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', जमीन घोटाळ्या प्रकरणी विजय कुंभार-अंजली दमानियांचा दावा!

Recommended

पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

June 25, 2025
Ajit Pawar And Sharad Pawar

अजित पवारांच्या आमदाराचे भाकीत, “तर दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात…”

July 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved