पुणे : पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा थेट सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला ही जमीन मिळवून देण्यासाठी खोटी पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करण्यात आली असून, यात एकाच नोटरीकडून बनावट कागदपत्रे तयार झाली आहेत. हा घोटाळा गेल्या ५-६ वर्षांपासून सुरू असल्याचा दावा कुंभार यांनी केला.
कुंभार यांनी सांगितले की, यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते, पण पार्थ यांनी ते आपले नाही असे सांगितले. मात्र २५ मे २०२१ रोजी झालेल्या व्यवहाराची सर्व कागदपत्रे सरकारकडे आहेत. पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही आणि फोटो आहे. ही कागदपत्रे ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर, दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांकडून पाठवली गेली आहेत.
या कागदपत्रांमध्ये संतोष हिंगणे, तृप्ता ठाकूर, अजित पवारांचे पीए आणि EOW अधिकारी वाघमारे यांचे चॅट्सही आहेत. हे सर्व पोलिसांकडे गेले असूनही पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही. राजकीय दबावामुळे त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. अजित पवार आणि राज्यातील मुख्यमंत्री-महसूल मंत्री यांना याबाबत माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.
अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यातील व्यवहारात तीन OSD सहभागी आहेत. जर आज अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही तर उद्या पुण्यात जाऊन त्यांचे नाव घालण्याचा इशारा त्या देणार आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय तस्करीशी जोडले जाण्याची शक्यता असून, पोलिसांकडून सखोल तपासाची मागणी होत आहे. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात जाईल, असे संकेत कार्यकर्त्यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात अजितदादांची ‘पॉवर’, भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा झटका
-रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
-‘आज २२ जणांचा प्रवेश झाला, पुढेही धक्कातंत्र चालू राहील’, महेश लांडगेंचा रोख नेमका कोणाकडे?
-बिडकरांची रणनीती अन् मोहोळांची व्यूहरचना! भाजपमध्ये जोरदार इनकमिंग, राजकीय गणित बदलले














