पुणे : पुणे शहरात पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला चांगला जोर आला आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अशातच दोन्ही राष्ट्रवादींच्या वरिष्ठ नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली. पुण्यात आता दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर लढणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला असून थोड्याच वेळात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पोहोचवला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
‘दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपाची कोणतीही अडचण नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावरती लढवतील’, असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असून आज रात्री किंवा उद्या युतीची घोषणा होणार असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे.
आज संध्याकाळ पर्यंत निरोप द्या, असा अजित पवारांचा बैठकीला आलेल्या नेत्यांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे समोर येत आहे. आता अजित पवारांच्या या प्रस्तावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणं मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरे सेना-मनसे युतीत पुणे महापालिकेसाठी फॉर्म्युला ठरला; जागावाटप जवळपास निश्चित!
-राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? पुण्याचं राजकीय समीकरण बदलणार
-पुणे महापालिका निवडणूक: भाजपविरोधात ‘मेगा आघाडी’ची जोरदार तयारी; जागावाटपांत दोन्ही शिवसेनेची परवड!
-गणेश बीडकरांचा स्तुत्य उपक्रम; महा ई-सेवा केंद्रातून २७ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ
-प्रभाग ९ मध्ये बदलाची चाहूल! भाजपकडून नवा चेहरा? लहू बालवडकरांची जोरदार चर्चा














