पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक ९ (सूस-बाणेर-पाषाण) हा प्रभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांच्यासाठी प्रभागातील राजकीय वातावरण अत्यंत अनुकूल असल्याचे चित्र दिसत आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासमोर मात्र दुहेरी आव्हान उभे राहिले आहे.
भाजपने प्रभाग ९ मधून लहू बालवडकर, रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या अंतर्गत चार सर्व्हे रिपोर्ट्समध्ये लहू बालवडकर सातत्याने आघाडीवर राहिले होते. त्यांची दांडगी लोकसंपर्क क्षमता, पक्षनिष्ठा आणि प्रभागातील प्रभावी कामगिरी यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून आहे.
आरएसएसच्या केडरचा पाठिंबा, शिस्तबद्ध प्रचार आणि चंद्रकांत पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा आशीर्वाद यामुळे लहू बालवडकर यांची टीम मजबूत स्थितीत आहे. प्रभागातील मतदार त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, अमोल बालवडकर यांची परिस्थिती आव्हानात्मक आहे. भाजपमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची लोकप्रियता घटली आणि सर्व्हे रिपोर्ट्समध्ये ते मागे पडले.
तिकीट न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. मात्र, यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत बंडखोरी उसळली. दिग्गज माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि पूनम विधाते यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
ज्यामुळे राष्ट्रवादीची वोटबँक विभागली जाण्याची शक्यता आहे. एकिकडे पक्षांतर्गत नाराजी, दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमधील रोष आणि मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम या दुहेरी कसोट्यांवर अमोल बालवडकर यांची परीक्षा लागणार आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, ही परिस्थिती भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आबा बागुलच, चार दशकांचे जिव्हाळ्याचे नाते
-‘दादा हाच का तुमचा वादा?’ म्हणत सुस, बाणेरकरांनी दाखवला अजित पवारांना आरसा
-ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन
-‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी
-पक्षविरोधी भूमिकेचा अमोल बालवडकरांना फटका; खापर मात्र वरिष्ठांवर फोडलं














