Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू

by News Desk
June 13, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड
Irfan Shaikh
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर येथील २२ वर्षीय इरफान समीर शेख याचा दुर्दैवी मृत्यू झाला. इरफान हा एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानात कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करणारा इरफान नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी घरी आला होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मृतदेह लवकर मिळावा, अशी मागणी त्यांचे नातेवाईक करत आहेत.

इरफान शेख हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील, मोठा भाऊ, आजी-आजोबा यांचा समावेश आहे. मूळचा साताऱ्यातील मेढा येथील असलेले शेख कुटुंब गेल्या पन्नास वर्षांपासून पिंपरीत स्थायिक आहे. इरफानने सुरुवातीला डोमेस्टिक क्रू म्हणून काम केले आणि नंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कॅबिन क्रू म्हणून कार्यरत झाला. मनमिळावू स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका होता. बकरी ईदसाठी घरी आल्यानंतर त्याने कुटुंबीयांसोबत तीन दिवस घालवले होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच कोसळले. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स असे एकूण २४२ जण होते. दुर्दैवाने, या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एकमेव व्यक्ती जिवंत आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. विमानाचा काही भाग डीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर पडल्याने त्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले. इरफानने टेकऑफपूर्वी आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

इरफानचा मृतदेह मिळवण्यासाठी त्याची आई आणि मोठा भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. मात्र, डीएनए तपासणीनंतरच त्यांचे पार्थिव कुटुंबीयांना सुपूर्द केले जाईल, अशी माहिती इरफानचे काका फिरोज शेख यांनी दिली. या अपघाताने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, इरफानच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना या दुखातून सावरण्यासाठी समाजाकडूनही पाठिंबा मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

-7 दिवसांपूर्वी लंडनमध्ये पत्नीचे निधन, शेवटची इच्छा पूर्ण करायला तो भारतात आला पण… विमान अपघातातील तरुणाची करून कहाणी

-अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका

-अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

-विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?

-पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान

Tags: AhemdabadGujratIrfan ShaikhPlanePlane crashअहमदाबादइरफान शेखगुजरातप्लेन क्रॅशविमान अपघात
Previous Post

7 दिवसांपूर्वी लंडनमध्ये पत्नीचे निधन, शेवटची इच्छा पूर्ण करायला तो भारतात आला पण… विमान अपघातातील तरुणाची करून कहाणी

Next Post

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं

Recommended

Dipak Kate

पुणे विमानतळावर भाजप युवा मोर्चा सचिवाला अटक; बॅगेत सापडले पिस्तूल अन् २८ जिवंत काडतुसे

January 7, 2025
आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’

March 23, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved