पुणे : नववर्षाचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यासाठी पुणे शहरात मोठी गर्दी अपेक्षित आहे. लष्कर आणि डेक्कन भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजल्यानंतर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे.
महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौक आणि फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहील. ही बंदी पहाटे ५ वाजेपर्यंत कायम राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने पुणेकर जल्लोषात असतानाच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून नववर्षाचा आनंद सुरक्षितपणे साजरा करता येईल.
फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूकबदल
– कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येणार आहे.
– जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
– वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
– फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
– बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्टस्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
– इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे.सरबतवाला चौकातून महावी चौकाकडे जाणारी वाहतूक करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण
-भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल
-तीन दशके पक्षाशी एकनिष्ठ आता मिळाली संधी, प्रभाग २६ मधून भाजपकडून स्नेहा माळवदे यांचा अर्ज दाखल
-हर्षवर्धन मानकर प्रभाग 11 मधून महापालिकेच्या मैदानात, अर्ज भरताच मांडला विकासाचा अजेंडा
-मोहोळांना नडले अन् पालिका निवडणुकीचे सगळेच प्लॅन फसले; भाजप-शिंदे सेना युतीत खेळखंडोबा














